भुजबळांना एक नंबर, तर विखेंना दोन क्रमांकाचे काॅटेज; रविभवन-नागभवनातील मंत्र्यांच्या काॅटेज निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 22:12 IST2025-11-12T22:05:54+5:302025-11-12T22:12:15+5:30
मंत्र्यांच्या बैठकीत होणार अंतिम शिक्कामोर्तब

भुजबळांना एक नंबर, तर विखेंना दोन क्रमांकाचे काॅटेज; रविभवन-नागभवनातील मंत्र्यांच्या काॅटेज निश्चित
नागपूर : येत्या ८ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. १९ डिसेंबरपर्यंतचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे. अधिवेशनाची तयारी जोरात सुरू आहे. मंत्र्यांच्या निवासाची व्यवस्था रविभवन आणि नागभवन येथे करण्यात आली आहे. मंत्र्यांना कॉटेज सुद्धा निश्चित करण्यात आले आहे.
अधिकारी स्तरावर रविभवनातील क्रमांक १ चे कॉटेज अन्न व प्रशासन मंत्री छगन भुजबळ यांना देण्यात आले आहे. तर जलसंपदा (गोदावर व कृष्णा खोरे) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना दोन क्रमांकाचे काॅटेज मिळणार आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांना क्रमांक ५ चे कॉटेज निश्चित करण्यात आले. यावर अंतिम निर्णय व्हायचा आहे. बांधकाम मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत या निवास वितरणावर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगण्यात येते.
रविभवनातील निवासाची व्यवस्था
मंत्री - कॉटेज क्रमांक
छगन भुजबळ - १
राधाकृष्ण विखे पाटील - २
हसन मुश्रीफ - ३
चंद्रकांत पाटील - ५
गिरीश महाजन - ७
गणेश नाईक - ८
गुलाब पाटील - १०
चंद्रशेखर बावनकुळे - ११
दादाजी भुसे - १२
संजय राठोड - १३
मंगलप्रसाद लोढा - १४
उदय सामंत - १५
जयकुमार रावल - १६
पंकजा मुंडे - १७
अतल सावे - २१
अशोक उईक - २४
शंभुराज देसाई - २५
आशिष शेलार - २६
दत्तात्रय भरणे - २७
आदिती तटकरे - २८
शिवेंद्रसिंह भोसले - ६
माणिक कोकाटे - २९
जयकुमार गोरे - ३०
नागभवनमधील निवास व्यवस्था
नरहरी झिरवाळ - १
संजय सावकारे - २
संजय शिरसाट- ३
प्रताप सरनाईक - ४
भरत गोगावले - ५
मकरंद जाधव - ६
नितेश राणे - ७
आकाश फुंडकर- ८
बाबासाहेब पाटील - ९
प्रकाश आबिटकर - १०
आशिष जयस्वाल - ११
माधुरी मिसाळ - १२
पंकज भोयर - १३
मेघना बोर्डिकर - १४
इंद्रनील नाईक - १५
योगेश कदम - १६