शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

‘मॉडर्न’ वसतिगृहासाठी ‘कॉर्पोरेट्स’ची मदत

By admin | Updated: August 20, 2014 01:06 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल लवकरच संपण्याची चिन्हे आहेत. अद्ययावत सोयीसुविधांनीयुक्त असे बहुमजली ‘मॉडर्न’ वसतिगृह उभारण्याच्या

नागपूर विद्यापीठ : व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विकासकामांना मंजुरीनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल लवकरच संपण्याची चिन्हे आहेत. अद्ययावत सोयीसुविधांनीयुक्त असे बहुमजली ‘मॉडर्न’ वसतिगृह उभारण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली. या वसतिगृहाच्या उभारणीसाठी ‘कॉर्पोरेट’ कंपन्यांसोबत प्रशासनाची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे ‘सीएसआर’ (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) अंतर्गत मदतीचा हात देण्यासाठी दोन कंपन्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे.व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.के.सी.देशमुख यांनी यासंदर्भात मंगळवारच्या बैठकीत ठराव मांडला. या प्रस्तावावर सखोल चर्चा करण्यात आली. विधी महाविद्यालय चौकातील विद्यापीठाच्या वसतिगृहाची इमारत जीर्ण होत असून विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत विद्यार्थ्यांसाठी सोयीसुविधांनी युक्त असे वसतिगृह बांधण्याची आवश्यकता आहेच असे मत सदस्यांनी व्यक्त केले. परंतु संबंधित ठिकाणची इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन वसतिगृह बांधण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो. अशा स्थितीत नवीन जागेवर २०० विद्यार्थी सामावू शकतील असे वसतिगृह बांधण्यास काहीच हरकत नाही असा सदस्यांचा सूर होता.दरम्यान, या वसतिगृहासाठी साधारणत: ६ कोटी ५१ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी काही ‘कॉर्पोरेट’ कंपन्यांसोबतच विद्यापीठाची चर्चा सुरू असल्याची माहिती व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांना प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी दिली. दोन मोठ्या ‘कॉर्पोरेट’ कंपन्यांनी यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली असून लवकरच विद्यापीठ व विद्यार्थ्यांना ‘गुड न्यूज’ मिळू शकते असे अनुपकुमार यांनी सदस्यांना सांगितले. सोबतच डॉ.के.सी.देशमुख यांनी ‘इनोव्हेटिव्ह पार्क’साठी स्थायी इमारत बनविण्यासंदर्भात ठराव सादर केला. ‘डिस्कव्हरी पार्क’, ‘बायोडायव्हर्सिटी पार्क’ आणि ‘टेक्नॉलॉजी पार्क’साठी नवीन प्रशासकीय इमारत परिसरातच ही स्थायी इमारत बनविण्यात यावी असे सदस्यांचे मत पडले. या ठरावालादेखील मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी)