Coronavirus: विदर्भात कोरोनाला हरवणाऱ्या जिगरबाजांचे प्रमाण लक्षणीय; ठणठणीत बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 06:41 IST2021-04-25T23:47:53+5:302021-04-26T06:41:58+5:30
ठणठणीत बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले

Coronavirus: विदर्भात कोरोनाला हरवणाऱ्या जिगरबाजांचे प्रमाण लक्षणीय; ठणठणीत बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले
नागपूर/अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर स्वार होऊन आलेल्या ‘डबल म्यूटंट’च्या त्सुनामीचा सामना करणाऱ्या विदर्भात रोज मोठ्या संख्येने नव्या बाधित रुग्णांची नोंद होत आहे. असे असले तरी दररोज मोठ्या हिंमतीने या रोगावर यशस्वी मात करणाऱ्या जिगरबाजांची संख्याही लक्षणीय आहे. गत आठवड्याच्या आकडेवारीवर नजर टाकली असता भंडारा, गोंदिया, वाशीम व बुलडाणा या जिल्ह्यांत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून येते. अमरावती, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यांतही बऱ्यापैकी रुग्ण ठणठणीत बरे होत आहेत.