शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

CoronaVirus in Nagpur : अजनीत तयार झाले १,१५० लिटर सॅनिटायझर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 10:05 PM

नागपूर विभागात ३ हजार मास्क आणि १,१५० लिटर सॅनिटायझर तयार करण्यात आले आहे. हे काम अजनीच्या लोकोशेडमध्ये करण्यात येत आहे.

ठळक मुद्देमहिला कर्मचाऱ्यांनी तयार केले ३ हजार मास्क

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्वजण पुढाकार घेत आहेत. यात भारतीय रेल्वेही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मालगाड्या, पार्सल रेल्वेगाड्यांमधून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू आहे. यासोबतच मास्क आणि सॅनिटायझर तयार करण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने पुढाकार घेतला आहे.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात एकुण १८ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. लॉकडाऊनच्या स्थितीत कामावर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझरचा तुटवडा होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने मास्क आणि सॅनिटायझर तयार करणे सुरू केले आहे. नागपूर विभागात अजनी परिसरात याचे काम सुरू आहे. कोरोनामुळे मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मध्य रेल्वे झोनमधील कारखान्यात सॅनिटायझर तयार करणे सुरू करण्यात आले आहे. सोबतच जे कर्मचारी घरी बसून काम करीत आहेत किंवा ज्या महिलांना सुटी देण्यात आली आहे त्या मास्क तयार करण्याचे काम करीत आहेत. नागपूर विभागात ३ हजार मास्क आणि १,१५० लिटर सॅनिटायझर तयार करण्यात आले आहे. हे काम अजनीच्या लोकोशेडमध्ये करण्यात येत आहे. सॅनिटायझर तयार करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहिती आणि फॉर्म्युल्याचा वापर करण्यात येत आहे. सॅनिटायझर आणि मास्कचे वितरण रेल्वे कर्मचाऱ्यांना करण्यात येणार असून ते अधिक झाल्यास बाहेरही त्याचे वितरण होऊ शकते.बाहेर वितरण करण्यासाठी प्रयत्न करू‘रेल्वेतील महिला कर्मचारी मास्क तयार करीत आहेत. अजनीच्या लोकोशेडमध्ये मास्क तयार करण्यात येत आहेत. तयार करण्यात आलेले मास्क, सॅनिटायझर रेल्वे कर्मचाऱ्यांना देण्यात येईल. उत्पादन अधिक झाल्यास ते बाहेर वितरित करण्याबाबत विचार करण्यात येईल.’एस. जी. राव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वे