"शासनाचा लॉकडाऊनचा आदेश हा व्यापाऱ्यांसाठी ‘डेथ वॉरंट’च", नागपुरात व्यापाऱ्यांची घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 13:05 IST2021-04-06T13:05:07+5:302021-04-06T13:05:34+5:30

Coronavirus Nagpur : मंगळवारी सकाळी महाल, इतवारी, गांधीबाग, सीताबर्डी, कमाल चौक, जरीपटका, खामला, सक्करदरा आदींसह सर्व बाजारपेठांमधील व्यापा-यांनी दुकाने सुरू करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना पोलिसांनी विरोध केला.

Coronavirus : "Government's lockdown order is a 'death warrant' for traders", traders announce in Nagpur | "शासनाचा लॉकडाऊनचा आदेश हा व्यापाऱ्यांसाठी ‘डेथ वॉरंट’च", नागपुरात व्यापाऱ्यांची घोषणाबाजी

"शासनाचा लॉकडाऊनचा आदेश हा व्यापाऱ्यांसाठी ‘डेथ वॉरंट’च", नागपुरात व्यापाऱ्यांची घोषणाबाजी

नागपूर - राज्य शासनाने सोमवारी काढलेला लॉकडाऊनचा आदेश हा व्यापाºयांसाठी ‘डेथ वारंट’च असल्याचे मत विविध व्यापारी संघटनांनी व्यक्त केले. ("Government's lockdown order is a 'death warrant' for traders", traders announce in Nagpur)

मंगळवारी सकाळी महाल, इतवारी, गांधीबाग, सीताबर्डी, कमाल चौक, जरीपटका, खामला, सक्करदरा आदींसह सर्व बाजारपेठांमधील व्यापा-यांनी दुकाने सुरू करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना पोलिसांनी विरोध केला. यावरून व्यापारी आणि पोलिसांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. इतवारी चौकात व्यापाºयांनी एकत्रित येऊन सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. शासनाने ३० एप्रिलपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्वच दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिल्याने व्यापारी संकटात आले आहेत. शासनाने वेळेची मर्यादा ठेवून दुकाने सुरू ठेवायला हवी होती. पुढे सण आहेत. व्यापाºयांनी माल भरला आहे. त्याच्या रकमेची परतफेड करायची आहे. व्यापार बंद राहिल्यास परतफेड कशी करणार, असा सवाल आहे. त्यामुळे व्यापारी आणखी संकटात येणार असल्याचे मत व्यापाºयांनी व्यक्त केले. लॉकडाऊनमुळे सर्वच दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे.

नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया म्हणाले, शासनाने लॉकडाऊनचा आदेश काढून व्यापा-यांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. शुक्रवार रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. आदेशात सोमवार ते शुक्रवार रात्रीपर्यंत कडक निर्बंध लावली आहेत. या दिवसातही दुकाने बंद राहणार आहे. शासनाचा लॉकडाऊन आदेश हा व्यापा-यांसाठी ‘डेथ वारंट’च आहे. यामुळे अनेक व्यापारी आत्महत्या करतील. लॉकडाऊन संदर्भात पालकमंत्री नितीन राऊत यांच्याशी बोलणी केल्यानंतर चेंबर पुढे आंदोलनाची रूपरेषा ठरविणार आहे. सणांच्या काळात लादलेला लॉकडाऊन व्यापाºयांच्या जीवावर बेतणार आहे. सरकारने आदेश मागे घ्यावा.

सोना-चांदी ओळ कमिटीचे सचिव राजेश रोकडे म्हणाले, शासनाचा ३० एप्रिलपर्यंतचा दुकाने बंदचा आदेश व्यापाºयांसाठी घातक ठरणार आहे. आधी कोरोना संपणार का, आधी व्यापारी, अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. गुढीपाडव्याचा सण १३ एप्रिलला आहे. सर्वांनी दागिन्यांचे आॅर्डर दिले आहेत. आता त्याचे काय होणार, असा गंभीर प्रश्न आहे. 

सरकारची मदत नाही
पूर्वी लॉकडाऊनच्या काळात सरकारने व्यापाºयांना काहीही मदत केली नाही, उलट चक्रवाढ व्याज लावून कर्ज वसूल केले. शिवाय आयकर रिटर्नमध्येही काहीही सूट दिलेली नाही. विजेचे बील, कर्मचाºयांचा पगार, बॅकांचे हप्ते भरावे लागले. पुढेही अशीच स्थिती निर्माण होणार आहे.

Web Title: Coronavirus : "Government's lockdown order is a 'death warrant' for traders", traders announce in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.