CoronaVirus in Nagpur : नागपुरात ४३ पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ५०० पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 11:18 PM2020-05-29T23:18:59+5:302020-05-29T23:25:11+5:30

गेल्या दोन आठवड्यापासून रुग्णांची संख्या मंदावली असताना शुक्रवारी रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला. तब्बल ४३ रुग्णांची नोंद झाली. आज नोंद झालेले सर्वाधिक रुग्ण नाईक तलाव व बांगलादेश येथील आहेत. येथून १९ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्णसंख्या ५०१वर पोहचली आहे.

Corona Virus in Nagpur: 43 positive in Nagpur, number of patients cross 500 | CoronaVirus in Nagpur : नागपुरात ४३ पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ५०० पार

CoronaVirus in Nagpur : नागपुरात ४३ पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ५०० पार

Next
ठळक मुद्देनाईक तलाव व बांगलादेश येथील १९ रुग्णांची नोंद, एकाच कुटुंबात १६ रुग्ण पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या दोन आठवड्यापासून रुग्णांची संख्या मंदावली असताना शुक्रवारी रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला. तब्बल ४३ रुग्णांची नोंद झाली. आज नोंद झालेले सर्वाधिक रुग्ण नाईक तलाव व बांगलादेश येथील आहेत. येथून १९ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्णसंख्या ५०१वर पोहचली आहे.
विशेष म्हणजे, आज भानखेडा, वसंतनगर व टांगा स्टॅण्ड परिसरात पहिल्यांदाच कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. आरोग्य यंत्रणेत चिंतेचे वातावरण आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) प्रयोगशाळेत ३३ नमुने पॉझिटिव्ह आले. यात दोन मोमीनपुरा, दोन आझमशहा चौक, चार सतरंजीपुरा, २३ नाईक तलाव व बांगलादेश येथील आहेत. हे सर्व रुग्ण पाचपावली पोलीस क्वॉर्टर येथे क्वारंटाईन होते. या शिवाय, उर्वरित दोन रुग्णांपैकी एक हिंगणा एमआयडीसी येथील ७३वर्षीय रुग्ण आहे. या रुग्णाला मेंदूज्वर झाल्याने धंतोली येथील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होेते. गेल्या दोन दिवसापासून सर्दी, खोकला वाढल्याने नमुने तपासण्यात आले असता, पॉझिटिव्ह अहवाल आला. यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले आहे. खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या मते, पीपीई किट घालूनच रुग्णावर उपचार केले आहेत. रुग्णाची प्रकृती गंभीर आहे. दुसरी रुग्ण भानखेडा येथील एक गर्भवती महिला आहे. गेल्या दोन दिवसापासून मेयोत संशयित म्हणून भरती होती. नीरीच्या लॅबमधून हंसापुरी येथील एक तर गड्डीगोदाम येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे.वसंतनगरमध्ये कोरोनाचा शिरकाव, हावरापेठमध्ये आणखी दोन रुग्ण हावरापेठ या वसाहतीतून आणखी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. या वसाहतीतील रुग्णांची संख्या आता पाच झाली आहे. याच रुग्णाच्या संपर्कात आलेल्या वसंतनगरमधील दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. वसंतनगरमध्ये आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद नव्हती. आता येथेही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या चारही रुग्णांचा नमुन्यांची तपासणी एम्समध्ये करण्यात आली. हे रुग्ण वनामती येथे क्वारंटाईन होते. -‘आरपीटीएस’चा जवान पॉझिटिव्ह ‘आरपीटीएस’चा एक जवान औरंगाबाद येथून गोंदिया येथे घरी जात होता. याची माहिती मिळताच त्यांचे नमुने एम्सच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आले. आज अहवाल पॉझिटिव्ह आला. पहिल्यांदाच नागपुरात ‘आरपीटीएस’ जवानाची बाधित रुग्ण म्हणून नोंद झाली आहे. रुग्णाला एम्समध्ये दाखल करण्यात आले.-कोरोनाची नवी वसाहत टांगा स्टॅण्ड २६ मे रोजी सीए रोड येथील ४० वर्षीय डॉक्टर पॉझिटिव्ह आला होत. आता संपर्कात आलेले समोर येत आहे. यात टांगा स्टॅण्ड परिसरात राहणारी त्यांची दोन्ही मुले तर सीए रोड परिसरात राहणारी त्यांच्या पत्नीही पॉझिटिव्ह आल्या आहेत. हे तिघेही रविभवन येथे क्वारंटाईन होेते. यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहेत. -आठ रुग्णांना डिस्चार्जमेयो रुग्णालयातून आठ रुग्णांंना सुटी देण्यात आली. यात सहा मोमीनपुराील तर दोन गिट्टीखदान येथील रुग्ण आहेत. यात एक पाच वर्षीय चिमुकलीचा समावेश आहे.

कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित ९५
दैनिक तपासणी नमुने ३२६
दैनिक निगेटिव्ह नमुने २८३
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ५०१
नागपुरातील मृत्यू ०९
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ३७०
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण २६१२
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १८००
पीडित-५०१-दुरुस्त-३७०-मृत्यू-९

Web Title: Corona Virus in Nagpur: 43 positive in Nagpur, number of patients cross 500

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.