शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

CoronaVirus in Nagpur : ४ दिवसात ४ हजारावर कोरोनाचे रुग्ण,  १०७० नव्या रुग्णांची भर, ८ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 11:53 PM

CoronaVirus , Nagpur news कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यापेक्षा वाढतच चालला आहे. चार दिवसात चार हजारांवर रुग्णांची नोंद झाली. गुरुवारी १०७० नव्या रुग्णांची भर पडली तर, ८ रुग्णांचे जीव गेले.

ठळक मुद्देचाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण ९.७४ टक्के

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यापेक्षा वाढतच चालला आहे. चार दिवसात चार हजारांवर रुग्णांची नोंद झाली. गुरुवारी १०७० नव्या रुग्णांची भर पडली तर, ८ रुग्णांचे जीव गेले. रुग्णांची एकूण संख्या १,५३,८८२ व मृतांची संख्या ४,३६५ झाली. विशेष म्हणजे, मागील तीन दिवसापासून दैनंदिन चाचण्यांची संख्या १० हजारावर जात आहे. आज चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण ९.७४ टक्क्यावर गेले.

नागपूर जिल्ह्यात आज ७,६५९ आरटीपीसीआर व ३,३१९ रॅपिड अँटिजेन असे एकूण १०,९७८ कोरोना संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. आरटीपीसीआरमध्ये १०२६ तर अँटिजेनमधून ५३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात मेडिकलच्या प्रयोगशाळेत १८०, मेयोच्या प्रयोगशाळेत १७७, एम्सच्या प्रयोगशाळेत १२९, नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत १००, नीरीच्या प्रयोगशाळेत ६१ तर खासगी लॅबमधून ३७० रुग्णांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले. आतापर्यंत १२७७३६१ संशयित रुग्णांच्या चाचण्या झाल्या. यात ८३९०६८ आरटीपीसीार तर ४३८२९३ अँटिजेन चाचण्यांचा समावेश आहे.

बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्क्यांवरून ९० टक्क्यांवर

१ फेब्रुवारी रोजी कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९४.५७ टक्के होते. ४ मार्च रोजी ते ९०.९० टक्क्यांवर आले आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेत चिंतेचे वातावरण आहे. आज ७२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या १३९८८६ झाली आहे.

शहरात ८४५ तर ग्रामीणमध्ये २२३ रुग्ण

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ८४५, ग्रामीणमधील २२३ तर जिल्हाबाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील ४, ग्रामीण व जिल्हाबाहेरील प्रत्येकी २ रुग्णांचा समावेश आहे. शहरात आतापर्यंत १२२७२९ रुग्ण व २८१७ मृत्यू तर, ग्रामीणमध्ये ३०२०० रुग्ण व ७७७ मृत्यूची नोंद झाली आहे.

मेडिकलमध्ये १६८ तर, मेयोमध्ये ७६ रुग्ण

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने शासकीयसह खासगी रुग्णालयात रुग्णांची संख्याही वाढत चालली आहे. सध्या मेडिकलमध्ये १६८, मेयोमध्ये ७६ तर, एम्समध्ये ४५ रुग्ण भरती आहेत. खासगीमध्ये सर्वाधिक ८५ रुग्ण, किंग्जवे हॉस्पिटलमध्ये आहेत. उर्वरित रुग्णालयात ४ ते ५० दरम्यान रुग्ण उपचार घेत आहेत. एकूण २५८० रुग्ण उपचाराखाली आहेत. ७०५१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

दैनिक चाचण्या : १०९७८

 बाधित रुग्ण : १५३८८२

 बरे झालेले : १३९८८६

 उपचार घेत असलेले रुग्ण : ७०५१

 मृत्यू : ४३६५

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर