शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
4
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
5
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
6
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
7
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
8
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
9
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
10
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
11
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
12
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
13
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
14
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
15
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
16
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
17
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
18
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
19
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
20
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा

CoronaVirus in Nagpur : कोरोनाचे २९० पॉझिटिव्ह, ३३० बरे, ७ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 9:53 PM

Corona Virus, Nagpur news मागील पाच दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे. यातच रुग्णसंख्येच्या तुलनेत अधिक रुग्ण बरे होऊ लागल्याने आरोग्य यंत्रणेसाठी दिलासादायक चित्र आहे.

ठळक मुद्दे आरोग्य यंत्रणेसाठी दिलासादायक चित्र

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : मागील पाच दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे. यातच रुग्णसंख्येच्या तुलनेत अधिक रुग्ण बरे होऊ लागल्याने आरोग्य यंत्रणेसाठी दिलासादायक चित्र आहे. गुरुवारी २९० नव्या रुग्णांची भर पडली, तर ३३० रुग्ण बरे झाले. रुग्णांची एकूण संख्या १,३१,५४० झाली. आज ७ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ४,१०६ वर पोहाेचली.

नागपूर जिल्ह्यात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील २३७, ग्रामीण भागातील ५० तर जिल्हा बाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरात १,०४,४३४, ग्रामीणमध्ये २६,२५७ तर जिल्हाबाहेरील ८४९ बाधितांची नोंद झाली. मृतांमध्ये शहरात ३, ग्रामीणमध्ये १ तर जिल्हाबाहेर ३ मृत्यू झाले. एकूण मृतांमध्ये शहरातील २,७१०, ग्रामीणमध्ये ७२९ तर जिल्हाबाहेर ६६७ रुग्णांचे मृत्यू झाले. आज ४,०७५ चाचण्या झाल्या. यात ३,४६५ आरटीपीसीआर व ६१० रॅपीड अँटीजेन चाचण्यांचा समावेश होता. अँटीजेनमध्ये ४५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. आरटीपीसीआर झालेल्या चाचणीत एम्समध्ये २४, मेडिकलमध्ये ५०, मेयोमध्ये ४७, निरीमध्ये १७, नागपूर विद्यापीठामध्ये २७ तर खासगी लॅबमध्ये ८० बाधित रुग्णांची नोंद झाली.

९३.९९ टक्के रुग्णांची कोरोनावर मात

१,२३,६४२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. याचे प्रमाण ९३.९९ टक्क्यांवर गेले आहे. सध्या ३,७९२ रुग्ण उपचाराखाली आहेत. यातील १०१० रुग्ण शासकीयसह खासगी रुग्णालयात तर २,७८२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. मेडिकलमध्ये १०६, मेयोमध्ये ८० तर एम्समध्ये २९ रुग्ण उपचार घेत आहेत.

दैनिक संशयित : ४,०७५

बाधित रुग्ण : १,३१,५४०

बरे झालेले : १,२३,६४२

 उपचार घेत असलेले रुग्ण : ३,७९२

मृत्यू : ४,१०६

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर