शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाचे १३ बळी, २७० नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 11:21 PM

कोरोना विषाणू संसर्गाचा आलेख वाढतच चालला आहे. विशेषत: मृत्यूची संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. शनिवारी तब्बल १३ मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंतची ही सर्वाधिक बळींची संख्या आहे. मृतांची संख्या १३९ वर पोहचली आहे.

ठळक मुद्देमृत्यूसंख्येचाही उच्चांक : ग्रामीणमध्ये १४८ तर शहरात १२२ रुग्ण पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणू संसर्गाचा आलेख वाढतच चालला आहे. विशेषत: मृत्यूची संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. शनिवारी तब्बल १३ मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंतची ही सर्वाधिक बळींची संख्या आहे. मृतांची संख्या १३९ वर पोहचली आहे. शिवाय, २७० नवे रुग्ण आढळून आल्याने रुग्णसंख्या ५६६२ झाली आहे. विशेष म्हणजे, रोजच्या रुग्णसंख्येत आज नागपूर ग्रामीणने शहराला मागे टाकले. नागपूर जिल्ह्यात जुलै महिन्यात ४९ मृत्यू झाले, तर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेलाच १३ मृत्यूची नोंद झाली. यात मेयोमध्ये सात तर मेडिकलमध्ये सहा मृत्यू आहेत. मेयोमधील मृतांमध्ये वाठोडा येथील ४३ वर्षीय महिला असून रुग्णाला न्यूमोनियासोबतच फुफ्फुसाचा आजार होता. ताजबाग येथील ६७ वर्षीय पुरुषाला अनियंत्रित मधुमेह, न्यूमोनिया व श्वसनाचा आजार होता. महेंद्रनगर टेका येथील ४५ वर्षीय महिलेला उच्चरक्तदाब, अनियंत्रित मधुमेह व थायरॉईड आदी आजार होते. इतवारी येथील २६ वर्षीय युवकाला मूत्रपिंडाचा आजारासोबत उच्चरक्तदाब, श्वसनाचा विकार होता. जवाहरनगर येथील ७४ वर्षीय पुरुषाला न्यूमोनियासोबत श्वसनविकाराचा आजार होता. पाचपावली जागनाथ बुधवारी येथील ५० वर्षीय महिलेला न्यूमोनिया व फुफ्फुसांचा आजार होता तर झिंगाबाई टाकळी येथील ५९ वर्षीय पुरुषाला उच्चरक्तदाब व इतरही आजार होते. मेडिकलमधील मृतांमध्ये वाठोडा रोड येथील ५५ वर्षीय महिला, मिनीमातानगर येथील ५० वर्षीय महिला, मध्य प्रदेश येथील ४७ वर्षीय महिला, केळीबाग रोड महाल येथील ८० वर्षीय पुरुष, सोमवारी येथील ९० वर्षीय महिला व कामठी येथील ७० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. यांना न्यूमोनिया, फुफ्फुसाचा आजारासोबतच इतरही आजार होते. आतापर्यंत शहरात ८१, ग्रामीणमध्ये २१ तर जिल्हाबाहेर ३१ असे १३९ मृत्यू झाले आहेत.१४३ रुग्णांना रुग्णालयातून सुटीमेयोच्या प्रयोगशाळेत सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. ७६ रुग्ण बाधित आले. मेडिकलच्या प्रयोगशाळेत ५६, एम्सच्या प्रयोगशाळेत ३६, नीरीच्या प्रयोगशाळेत ३७, माफसूच्या प्रयोगशाळेत आठ, खासगी लॅबमध्ये ४२, रॅपीड अ‍ॅन्टिजन चाचणीमधून १५ असे एकूण २७० रुग्ण पॉझिटिव्ह आले. आज १४३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३५५६ झाली आहे. मेयो, मेडिकल, एम्ससह कोविड केअर सेंटरमध्ये १९६७ रुग्ण उपचाराला आहेत.या वसाहतीत आढळून आले रुग्णमनपाच्या आरोग्य विभागाकडे नोंद झालेल्या रुग्णांमध्ये बिनाकी मंगळवारी ३, नंदनवन ४, टेका ३, नारी ३, मानकापूर ५, लष्करीबगा २, पारडी १७, कोराडी २, इंदोरा ४, सदर ४, शांतीनगर २, जोगीनगर १, जुनी शुक्रवारी १, जुना बगडगंज २, गरोबा मैदान ४, हसनबाग १, नरसाळा २, रामेश्वरी २, मिनीमातानगर २, हुडकेश्वर १, गांधीचौक ५, मेडिकल ६, अजनी रेल्वे क्वॉर्टर २, गोलछा मार्ग १, बजरंगनगर १, मोठा ताजबाग ३, कळमना ४, गोधनी १, राणी भोसलेनगर ३, टेलिफोन एक्सचेंज चौक २, खरबी ४, छापरूनगर १, न्यू सुबेदार २, क्वेटा कॉलनी १, प्रशांतनगर १, पोलीस लाईन टाकळी १, अशोकनगर ३, गणेशनगर १, जरीपटका ४, दिघोरी १, नवीन मंगळवारी १, टिमकी २, पंचशीलनगर २, तांडापेठ १, गोपालकृष्णनगर १, न्यू डायमंडनगर १, बुद्धनगर १, लकडगंज २, इतवारी ४, वाठोडा १, सिव्हील लाईन्स व्हीसीए ग्राऊंड परिसर २, नरेंद्रनगर १, समाधान कॉलनी दुबे नगर १, कश्मिरी गल्ली ३, सुभाषनगर २, व्हीएनआयटी परिसर १, सीए रोड देशपांडे ले-आऊट १, पाचपावली बारसेनगर १, मोहननगर १, यशोधरानगर १, हिवरीनगर वर्धमान चौक १, वर्धमाननगर रोड १, श्रीहरी नगर ओमकारनगर २, संयोग नगर ४, सूर्यनगर १, गोकुळपेठ १, पिवळीनदी १, गोरोवाडा १, खामला रोड १, नर्मदा कॉलनी काटोल रोड १, तेलंगखेडी १, नाईक रोड १, मानेवाडा १, जागन्नाथ बुधवारी १, नेताजी रोड १, केळीबाग महाल रोड येथील १ रुग्णाचा समावेश आहे.दैनिक संशयित :३३२बाधित रुग्ण : ५६६२बरे झालेले : ३५५६उपचार घेत असलेले रुग्ण : १९७६मृत्यू : १३९

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूnagpurनागपूर