शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

CoronaVirus in Nagpur : नागपुरात दोन दिवसांत १०९ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 10:33 PM

बाधितांच्या व मृतांच्या वाढत्या संख्येने कोरोनाची भीती वाढत चालली आहे. दोन दिवसात १०९ रुग्णांचा मृत्यू झाला. यात गुरुवारी सर्वाधिक, ६४ मृत्यूची नोंद झाली. गुरुवार व शुक्रवार मिळून ३४२० नव्या रुग्णांची भर पडली.

ठळक मुद्दे ३४२० रुग्णांची नोंद : ४४६९ कोरोनाबाधित झाले बरे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाधितांच्या व मृतांच्या वाढत्या संख्येने कोरोनाची भीती वाढत चालली आहे. दोन दिवसात १०९ रुग्णांचा मृत्यू झाला. यात गुरुवारी सर्वाधिक, ६४ मृत्यूची नोंद झाली. गुरुवार व शुक्रवार मिळून ३४२० नव्या रुग्णांची भर पडली. दिलासादायक बाब म्हणजे, बाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक आहे. ४४६९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. रुग्णांची एकूण संख्या ६०,९०२ तर मृतांची संख्या १९३५ वर पोहचली आहे. नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. गुरुवारी १७१७ रुग्ण व ६४ मृत्यू झाले तर शुक्रवारी १७०३ रुग्ण व ४५ रुग्णांचे बळी गेले. शहरात कोरोनाबाधितांची एकू ण संख्या ४८४२९, ग्रामीणमध्ये १२११८ तर जिल्ह्याबाहेर ३५५ झाली आहे. शहरात आतापर्यंत १४४९, ग्रामीणमध्ये ३१३ तर जिल्ह्याबाहेर १७३ रुग्णांचे जीव गेले आहेत. जिल्ह्यात रोजच्या मृत्यूची संख्या ६०वर गेल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.३०६२ अ‍ॅन्टिजन चाचणीत ४७१ पॉझिटिव्ह लक्षणे असलेल्या व पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचे तातडीने निदान करण्यासाठी रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचणी महत्त्वाची ठरते. परंतु लक्षणे नसलेले ही चाचणी करीत असल्याने निगेटिव्ह येण्याचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी जिल्ह्यात ३०६२ चाचण्या झाल्या. यात ४७१ रुग्ण पॉझिटिव्ह तर २५९१ रुग्ण निगेटिव्ह आले. विशेष म्हणजे, लक्षणे असूनही या चाचणीत निगेटिव्ह आलेल्यांना आरटीपीसीआर चाचणी करण्याचा डॉक्टर सल्ला देतात.

आरटीपीसीआर चाचणीत १२३२ रुग्ण बाधितआज ३०८९ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. १२३२ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर १८५७ रुग्ण निगेटिव्ह आले. यात एम्सच्या प्रयोगशाळेतून ७७, मेडिकलच्या प्रयोगशाळेतून १२४, मेयोच्या प्रयोगशाळेतून ११८, माफसूच्या प्रयोगशाळेतून ५०, नीरीच्या प्रयोगशाळेतून ३९ तर खासगी प्रयोगशाळेतून ८२४ रुग्ण कोविड पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले.दिवसभरात ३०२४ रुग्ण बरेशुक्रवारी दिवसभरात ३०२४ रुग्ण बरे झाले. आतापर्यंतची सर्वात मोठी कोरोनामुक्तांची संख्या आहे. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४८३९६वर गेली आहे. यात शहरातील ३९६३८ तर ग्रामीणमध्ये ८७५८ कोरोनामुक्त आहेत. एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ७९.४७ टक्क्यांवर पोहचले आहे. सध्याच्या स्थितीत १०५७१ रुग्ण मेयो, मेडिकलसह एम्स व खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.ट्रान्झिटमधील ११ कर्मचारी पॉझिटिव्हवन विभागाच्या सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरच्या २५ पैकी ११ कर्मचाऱ्यांना कोरोना संक्रमण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार चार दिवसापूर्वी १४ सप्टेंबरला सेंटरमधील एक डॉक्टर आणि अन्य दोन कर्मचारी संक्रमित आढळले होते. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. पॉझिटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्यांना आणि चाचणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रिपोर्ट येईपर्यंत होम आयसोलेशनचे निर्देश देण्यात आले होते. परंतु, दोनच दिवसात ११ कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. काही मर्यादित कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने सेंटरमध्ये वन्य प्राण्यांवर उपचार केला जात आहे. यापूर्वी वन मुख्यालय व सेमिनरी हिल्स कार्यालयातील कर्मचारीही पॉझिटिव्ह आले होते.

कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित : ६१५१बाधित रुग्ण : ६०९०२बरे झालेले : ४८३९६ उपचार घेत असलेले रुग्ण : १०५७१ मृत्यू :१९३५

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूnagpurनागपूर