शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
2
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
3
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
४ जूनला मतमोजणी, १ जूनला इंडिया आघाडीची मोठी बैठक; केजरीवाल, स्टॅलिन यांना निमंत्रण
5
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
7
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हूडाने मनातली भावना स्पष्टच सांगितली
8
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
9
गुरु रंधावा-शहनाज गीलच्या डेटिंगचं सत्य आलं समोर; गायकाने केला खुलासा, म्हणाला, 'मी डेट करायला सुरुवात...'
10
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
11
जान्हवी कपूरने शेअर केला हिंदी मालिकेचा प्रोमो, ऋतुजा बागवेची आहे मुख्य भूमिका
12
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
13
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
14
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
15
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
16
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
17
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
19
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
20
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही

Corona vaccine : पती पाठोपाठ पत्नीचीही प्राणज्योत मावळली, लोणारे कुटुंबावर नियतीचा घाला  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 10:08 PM

पती निघून गेल्याची बाब सुद्धा पत्नीला होऊ देण्यात आली नाही. प्रकृती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच नागपूरला हलविण्यात आले. परंतु नियतीला ते मान्य नसावे. शर्तीचे प्रयत्न करुन मंगळवारी (दि.४) रात्री ११.३० वाजता पत्नीची प्राणज्योत मालवली.

बोंडगावदेवी  - घरामध्ये आनंदीमय वातावरणात अल्पश: आजारानी पती-पत्नीला घेरले. दोघांवर औषध उपचार सुरु होता. पतीला शहराच्या ठिकाणी औषधोपचार सुरु असताना नियतीने घाला घातला. अखेर पतीने मृत्यूला कवटाळले. पत्नी अंथरुणावर पडली. पती निघून गेल्याची बाब सुद्धा पत्नीला होऊ देण्यात आली नाही. प्रकृती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच नागपूरला हलविण्यात आले. परंतु नियतीला ते मान्य नसावे. शर्तीचे प्रयत्न करुन मंगळवारी (दि.४) रात्री ११.३० वाजता पत्नीची प्राणज्योत मालवली. पाच दिवसाच्या अंतराने पतीच्या पाठोपाठ पत्नीचेही निधन झाल्याने लोणारे परिवारावर दुखाचे डोंगर कोसळले.

येथील रहिवासी असलेले सिद्धार्थ मुखलता लोणारे हे नोकरी निमित्ताने वडसा येथे राहत होते. दोन वर्षापुर्वीच ते प्राचार्य पदावरुन सेवानिवृत्त झाले होते. पत्नी सरोज मुलगा निलेश, मुलगी स्नेहल यांच्यासोबत आनंदाने राहत होते. मुलगा व मुलगी शिक्षणासाठी आई-वडीलांपासून दूर राहत होते. बोंडगावदेवी या आपल्या जन्मगावी पत्नीसह येण्याचा त्यांचा नित्यनेम होता. मित्र परिवार नातलग यांच्या कार्यक्रमात त्यांची आवर्जुन उपस्थिती राहायची. कोरोना महामारीच्या संक्रमणात क्रुर काळाने घाला घातला. पती-पत्नी दोघांचीही प्रकृती बिघडली. सिद्धार्थ लोणारे यांच्यावर गडचिरोली येथे औषधोपचार सुरु असताना ३० एप्रिल रोजी त्यांचे निधन झाले.सज्ञान असलेल्या निलेश या मुलाने वडीलाच्या निधनाची माहिती आईला होऊ दिली नाही. पती दुरुस्त होऊन घरी येतील अशी आशा पत्नी सरोज करीत होती. पत्नी आजाराने ग्रस्त होती. आईची प्रकृती बरी व्हावी म्हणून मुलाने डॉक्टरच्या सल्ल्याने आईच्या उपचारावर भर दिला. परंतु नियतीला हे मान्य नसावे. प्रकृतीत सुधारणा न होता खालावत गेली. नागपूरला हलविण्यात आले. अखेर ४ मे रोजी रात्री ११.३० वाजता सरोज सिद्धार्थ लोणारे यांनी अखेरचा श्वास घेतला. सिद्धार्थ (६०) सरोज (५०) या पती-पत्नीच्या एकाएकी निधनाने लोणारे परिवारावर दुखाचे सावटच कोसळले. सज्ञान असलेल्या दोन्ही बहिण भावांचे आधारवड हरपले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र