शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
3
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
4
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
5
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
6
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
7
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
9
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
10
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
12
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
13
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
14
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
15
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
16
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
17
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
18
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
19
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
20
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड

कोरोना संशयित रुग्ण मेडिकलमध्ये दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 12:38 AM

चीनसह सर्वच ठिकाणी दहशत माजविलेल्या कोरोना व्हायरसने भारतातही प्रवेश केला आहे. केरळमध्ये या विषाणूच्या पहिल्या रुग्णांची नोंद झाली आहे तर, नागपुरातील मेडिकलमध्ये पहिल्या संशयित रुग्ण दाखल झाला आहे.

ठळक मुद्देपुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविले नमुने : वॉर्ड क्र. २५ मध्ये सात खाटा राखीव

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : चीनसह सर्वच ठिकाणी दहशत माजविलेल्या कोरोना व्हायरसने भारतातही प्रवेश केला आहे. केरळमध्ये या विषाणूच्या पहिल्या रुग्णांची नोंद झाली आहे तर, नागपुरातील मेडिकलमध्ये पहिल्या संशयित रुग्ण दाखल झाला आहे. त्याचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविले आहे. मेडिकलने या रोगाच्या संशयित रुग्णांसाठी वॉर्ड क्र. २५ मध्ये सात खाटा राखीव ठेवल्या आहेत.कोरोना व्हायरस सध्या जगात सर्वत्र चर्चेत आहे. चीनमधील वूआंग प्रांतात गेल्या काही आठवड्यांमध्ये हा साधारण विषाणू अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे. याच देशात २७ डिसेंबर रोजी नागपुरातील जरीपटका येथील ३५ वर्षीय युवक व्यवसायासाठी गेला. हा युवक ६ जानेवारीला भारतात परतला. नागपुरात त्याला २७ जानेवारीपासून सर्दी आणि खोकल्याचा त्रास सुरू झाला. कोरोना व्हायरस तर नसावा या शंकेपोटी पुणे आरोग्य विभागाला स्वत:च्या आरोग्याची माहिती दिली. संबंधित विभागाने नागपूरच्या आरोग्य विभागाला सूचना केल्या. येथील उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी तातडीने रुग्णाशी संपर्क साधला. मेडिकल प्रशासनाने गुरुवारी वॉर्ड क्र. २५ मध्ये दाखल करून घेतले.व्हेंटिलेटरसह इतरही सोयी उपलब्धमेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, संबंधित संशयित रुग्ण दाखल होताच घशाचे व रक्ताचे नमुने पुण्याच्या ‘एनआयव्ही’ प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. अशा संशयित रुग्णांसाठी वॉर्ड क्र. २५ मध्ये सात खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. गरज वाटल्यास हा ३० खाटांचा वॉर्डही पूर्णत: राखीव करण्यात येईल. येथे व्हेंटिलेटरसह आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.कोरोना व्हायरससाठी समिती स्थापनकोरोना व्हायरससाठी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या मार्गदर्शनात पाच सदस्यांची समिती तयार करण्यात आली आहे. यात नोडल अधिकारी म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांच्यासह औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गोसावी, मायक्रोबायलॉजीच्या डॉ. वंदना अग्रवाल, ईएनटी विभागाचे प्रमुख डॉ. ए.झेड. नितनवरे व पीएसएम विभागाचे प्रमुख डॉ. उदय नारलावार आदींचा समावेश आहे. संशयित रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.डॉ. अविनाश गावंडेवैद्यकीय अधीक्षक२८ दिवसांपर्यंत पाठपुरावादाखल झालेल्या संशयित रुग्णाचे नमुने पॉझिटीव्ह किंवा निगेटीव्ह आले तरी पुढील २८ दिवसापर्यंत पाठपुरावा केला जाईल. दिवसातून दोनवेळा दूरध्वनीद्वारे आरोग्याची माहिती घेतली जाईल.डॉ. संजय जयस्वालउपसंचालक, आरोग्य सेवा विभाग

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयcorona virusकोरोना