शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

कोरोनाचा गुढीपाडव्याला फटका : ५०० कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 12:41 AM

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने, वाहन आणि घर खरेदी शुभ मानली जाते.कोरोनामुळे नागपुरात जवळपास ५०० कोटींची उलाढाल ठप्प झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली.

ठळक मुद्देसोने-चांदी, वाहन, बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठा बंद

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने, वाहन आणि घर खरेदी शुभ मानली जाते. सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक्स मार्केट, वाहन बाजार, बांधकाम क्षेत्र या सर्व बाजारपेठांमध्ये या दिवशी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. यंदा मात्र या बाजारपेठेवर कोरोनाचा मोठा परिणाम झाला आहे. कोरोनामुळे नागपुरात जवळपास ५०० कोटींची उलाढाल ठप्प झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली.यंदा मात्र या बाजारपेठांवर कोरोनाचा मोठा परिणाम झाला आहे. राज्यात टाळेबंदी असल्याने सर्व बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे नागपूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्यात आल्या आहेत.सोने खरेदी शुभगुढीपाडव्याला सोने खरेदी शुभ मानली जाते. नागपुरात सोन्याची लहानमोठी जवळपास १५०० पेक्षा जास्त दुकाने आणि शोरूम आहेत. या दिवशी सोने-चांदी मार्केटमध्ये १०० कोटींपेक्षा जास्तची उलाढाल होते. पण संपूर्ण खरेदी-विक्री बंद राहिल्याने कुठलाही व्यवहार झाला नाही. त्यामुळे सराफांना आर्थिक फटका बसला आहे. गुढीपाडव्याला खरेदी-विक्री बंद राहण्याची दुसरी वेळ आहे. यापूर्वी २०१७ मध्ये सराफा विक्रेत्यांनी ४२ दिवसांचा बंद ठेवला होता. कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून केंद्र सरकारच्या टाळेबंदीला आमचे समर्थन असल्याचे मत सोना-चांदी ओळ कमिटीचे सचिव राजेश रोकडे यांनी सांगितले.वाहन मार्केटमधील १०० कोटींची उलाढाल ठप्पगुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दुचाकी आणि चारचाकी वाहने खरेदी करणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. यावर्षी कोरोनामुळे टाळेबंदी असल्याने खरेदी-विक्रीच बंद आहे. डॉ. पी.के. जैन म्हणाले, गेल्या तीन महिन्यापासून आॅटोमोबाईल क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. बीएस-६ ची वाहने बाजारात येणार असल्याने बीएस-४ च्या वाहनांचे उत्पादन जानेवारीपासून बंद आहे. यामुळे हे मार्केट ठप्प आहे. दरवर्षी गुढीपाडव्याला जवळपास ५ हजार दुचाकी आणि २ हजार चारचाकी वाहनांची विक्री होते. यावर्षीही तेवढ्याचा विक्रीची अपेक्षा होती. पण कोरोनामुळे विक्री थांबली.बांधकाम क्षेत्राला कोट्यवधींचा फटकाकेंद्र आणि राज्य सरकारच्या करकपातीमुळे बांधकाम क्षेत्राला चांगले दिवस आले होते. लोकांची फ्लॅट, प्लॉट आणि डुप्लेक्सची खरेदी वाढली होती. रजिस्ट्री शुल्कात एक टक्के कपात केल्याने लोकांचा घर खरेदीकडे कल वाढला होता. गुढीपाडव्याला घर खरेदीसाठी चांगला मुहूर्त आहे. बिल्डर्सची चांगली तयारी होती. पण कोरोनामुळे या क्षेत्रात पुन्हा मंदी आली आहे. एक महिन्यापासून घरासाठी कुणाही विचारणा करीत नाही. त्यामुळे बांधकाम क्षेत्र पुन्हा मंदीत आहे. कोरोनामुळे दुहेरी मार पडला आहे. या क्षेत्राला पुन्हा शासनाच्या मदतीची गरज असल्याचे मत क्रेडाई नागपूर चॅप्टरचे सचिव गौरव अगरवाला यांनी व्यक्त केले.बँकांच्या कर्जाचा बोजाकोणताही व्यवसाय वा प्रकल्प सुरू करताना व्यापाऱ्यांना बँकांकडून कर्ज घ्यावे लागते. पण अन्य कारणाने वा कोरोना व्हायरसमुळे व्यापार वा उद्योग मंदीत आल्यास कर्ज आणि त्यावरील व्याजाची हप्तेवारी वाढत जाते. अशा परिस्थितीत व्यापारी वा उद्योजक खचून जातो. अशावेळी शासनाने प्रोत्साहनपर योजना राबविण्याची गरज असल्याचे अगरवाला म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgudhi padwaगुढीपाडवा