शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना वाढताच लसीकरणाचा टक्काही वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:19 IST

नागपूर : कोरोनाबाधितांमध्ये वाढ होताच याचा परिणाम लसीकरणावरही झाला. ५० टक्क्यांवर असलेले लसीकरण सध्या ८६ टक्क्यांवर गेले आहे. गुरुवारी ...

नागपूर : कोरोनाबाधितांमध्ये वाढ होताच याचा परिणाम लसीकरणावरही झाला. ५० टक्क्यांवर असलेले लसीकरण सध्या ८६ टक्क्यांवर गेले आहे. गुरुवारी ३५०० पैकी ३०१८ म्हणजे ८६ टक्के लाभार्थ्यांनी लस घेतली. विशेष म्हणजे, १५ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या दुसऱ्या डोसच्या लसीकरणालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

नागपूर शहरात १९ केंद्रांवर प्रत्येकी १०० प्रमाणे १९०० लसीकरणाचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी फ्रंट लाइन वर्कर व हेल्थ वर्कर मिळून २०२० लाभार्थ्यांना लस देण्यात आली. विशेष म्हणजे, दुसऱ्या डोसचे २७४ लसीकरणाचे लक्ष्य होते. याचे १०० टक्के लसीकरण झाले. यावरून लसीकरणाविषयी गंभीरता वाढत असल्याचे चित्र आहे.

- ग्रामीणमध्ये ५६ टक्के लसीकरण

नागपूर ग्रामीणला २२२० लसीकरणाचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी १२४७ लसीकरण झाले. एकूण ५६ टक्के लाभार्थ्यांना लस देण्यात आली. ९०२१ पैकी आतापर्यंत ९०० लाभार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे.