शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील कन्व्हेंशन सेन्टर हलविणार नाही

By admin | Updated: February 11, 2015 02:37 IST

कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलजवळील ओगावा सोसायटीच्या २० एकर जागेवर स्वतंत्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे ...

नागपूर : कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलजवळील ओगावा सोसायटीच्या २० एकर जागेवर स्वतंत्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे बुद्धिस्ट थीम पार्क व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर साकारण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूर शहरातील कन्व्हेंशन सेंटर हलविण्याचा प्रश्नच नसल्याची माहिती माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.नागपूरला मेट्रोचा दर्जा मिळाल्याने नागपूर शहरापासून २५ किलोमीटर पर्यंत मेट्रोसिटीचा विकास होणार आहे. जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी या दृष्टिकोनातून ड्रॅगन पॅलेस टेम्पललगतच्या ओगावा सोसायटीच्या २० एकर जागेवर नागपुरातील प्रस्तावित असलेल्या कन्व्हेंशन सेंटरच्या धर्तीवर बुद्धिस्ट थीम पार्क व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेन्टर साकार व्हावे यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली रविभवन येथे बैठक घेण्यात आली. यात त्यांनी या प्रकल्पाचा २१४ .५० कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याच्या सूचना नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांना केल्याची माहिती कुंभारे यांनी दिली.नागपूरच्या कन्व्हेंशन सेंटरसोबत कामठीतील सेंटरचा कोणताही संबंध नाही. उत्तर नागपुरात असे सेंटर उभे राहात असेल तर आनंदच आहे. दोन्ही सेंटरचा आराखडा वेगवेगळा आहे. (प्रतिनिधी)