नागपुरात टिप्परच्या धडकेत कंत्राटदाराचा करुण अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 22:57 IST2019-07-05T22:56:40+5:302019-07-05T22:57:44+5:30
भरधाव टिप्परच्या चालकाने जोरदार धडक मारल्यामुळे एका दुचाकीस्वार कंत्राटदाराचा करुण अंत झाला. शुक्रवारी दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास मिहान परिसरातील सुमठाणा टी पॉईंटवर हा भीषण अपघात घडला.

नागपुरात टिप्परच्या धडकेत कंत्राटदाराचा करुण अंत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भरधाव टिप्परच्या चालकाने जोरदार धडक मारल्यामुळे एका दुचाकीस्वार कंत्राटदाराचा करुण अंत झाला. शुक्रवारी दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास मिहान परिसरातील सुमठाणा टी पॉईंटवर हा भीषण अपघात घडला. राजेशकुमार रामतिरथ बावा (वय २५) असे मृताचे नाव असून तो अमरावती मार्गावरील जबलपूर गॅरेजजवळ, सुराबर्डी तकिया परिसरात राहत होता.
राजेशकुमार त्याच्या अॅक्टीव्हाने (एमएच ४९/ टीसीडी २४८) मिहान परिसरातील काही कंपन्यांमध्ये कंत्राटदारी करीत होता. नेहमीप्रमाणे तो शुक्रवारी दुपारी १२.४५ ला मिहान परिसरात आला. काम आटोपल्यानंतर एका कंपनीत बिल (रक्कम) घ्यायला जात होता. सुमठाणा टी पॉईंटवर वेगात आलेल्या पिवळ्या रंगाच्या टिप्पर (एमएच ४०/ एन ३१९८) चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून राजेशकुमारला जोरदार धडक मारली. त्यामुळे तो ठार झाला. योगेश रामकृष्णजी दांडगे (वय ३४, रा. बोरी ठाणेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला. हवालदार वसंता बशिने यांनी चौकशी करून आरोपी उमेश भीमराव दिनकर (भंडारा) याला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.