शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

देवेंद्र फडणवीसांना ट्रोल करण्यासाठी टोळी किंवा खासगी कंपनीला कंत्राट; तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 13:28 IST

देवेंद्र फडणवीस यांना सोशल मिडीयावर ट्रोल करण्यात येत असल्याच्या मुद्द्यामुळे राजकारण तापायला लागले आहे. नागपुरातील भाजप आमदारांनी यासंदर्भात पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांची भेट घेऊन तक्रार केली आहे.

ठळक मुद्देसत्तापक्षातील लोक सोशल मिडीयाचा दुरुपयोग करत असल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर - राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सोशल मिडीयावर ट्रोल करण्यात येत असल्याच्या मुद्द्यामुळे राजकारण तापायला लागले आहे. नागपुरातील भाजप आमदारांनी यासंदर्भात पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांची भेट घेऊन तक्रार केली आहे. जाणुनबुजून फडणवीस यांना ट्रोल करण्यात येत असून यासाठी एखादी टोळी किंवा कंपनीलाच कंत्राट देण्यात आले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे मुंबईतदेखील अशा आशयाची तक्रार झाली होती.फडणवीस हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे शासनाच्या त्रुटी समोर आणणे हे त्यांचे कर्तव्यच आहे. शिवाय राज्यपालांची भेट घेण्याचादेखील त्यांना अधिकार आहे. मात्र त्यांनी कुठलेही वक्तव्य केले, भूमिका मांडली किंवा राज्यपालांची भेट घेतली की त्यांच्यावर सोशल मिडीयात वाईट पद्धतीने ट्रोलिंग करण्यात येते.देवेंद्र फडणवीस यांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून धमक्या देण्याचे प्रयत्न होत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत अयोग्य भाषेचा वापर होत आहे. आमच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सत्तापक्षातील लोक अयोग्य पद्धतीने सोशल मिडीयाचा वापर करत आहेत. यामुळेच नागपुरचे आमदार, महापौर, शहराध्यक्षांनी मिळून पोलीस आयुक्तांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. असे प्रकार करणाऱ्यांवर त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आ.अनिल सोले यांनी केली.भाजपच्या शिष्टमंडळात आ.कृष्णा खोपडे, आ.विकास कुंभारे, आ.मोहन मते, आ.गिरीश व्यास,महापौर संदीप जोशी, शहराध्यक्ष प्रवीण दटके हे प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाJayant Patilजयंत पाटीलAnil Deshmukhअनिल देशमुखUddhav Thackerayउद्धव ठाकरे