शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विरोधक एकजूट होऊ नयेत म्हणून सत्ताधाऱ्यांचे कट-कारस्थान: ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका

By आनंद डेकाटे | Updated: January 7, 2026 18:30 IST

Nagpur : राज्यात होणारी बिनविरोध निवड असो वा राजकीय युती बघता संघ व भाजपने छोट्या-मोठया राजकीय पक्षांचे अस्तित्व संपविण्यास सुरूवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात होणारी बिनविरोध निवड असो वा राजकीय युती बघता संघ व भाजपने छोट्या-मोठया राजकीय पक्षांचे अस्तित्व संपविण्यास सुरूवात केली आहे. विरोधी पक्षांची युती आघाडी होऊच नये, यासाठी सत्ताधारी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कटकारस्थान रचले असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी येथे केला.

महानगर पालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते नागपुरात आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, नागपुरात त्यांची युती, आघाडी होवू शकली नाही. ज्यांची राज्यस्तरीय युती आहे, त्यांचीही टिकली नाही. त्यामुळे भाजप, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील अनेक ठिकाणी स्वतंत्र लढत आहे. आमच्याशी युती नाही तर कुणाशीही नाही, अशी भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली. त्यासाठी दबावतंत्र, ब्लॅकमेलिंग केले. पुराव्याशिवाय आरोप करणे योग्य नसले तरी वाटाघाटी दरम्यान जे अनुभव आले, यातून हे दिसते. राजकीय पक्षांच्या अस्तित्वांना आव्हान देण्याचे काम भाजप आणि आरएसएसने सुरू केले आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे. राजकीय पक्ष टिकले पाहिजे. नेतेच राहणार नाही, तर प्रश्नांवर आवाज कोण उचलणार, त्यामुळे पक्ष टिकले पाहिजे. त्यासाठी कुणालाही मतदान करा पण भाजपला मतदान करू नका, असे आवाहनही ॲड. आंबेडकर यांनी यावेळी केले.

दोन ते अडीज महिन्यात देशात युद्ध

स्वयंघोषीत विश्वगुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेकेखोरपणामुळे देश युध्दासमोर येऊन ठेपला आहे. परराष्ट्र धोरण पूर्णत: कोलमडले आहे. शेजारच्या पाकिस्तान व बांग्लादेशला हाताशी धरून इतर देश भारताला कोंडीत पकडत आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच चीनसंदर्भात पंतप्रधान कार्यालय व लष्कराची वेगवेगळी भूमिका असून येत्या दोन ते अडीज महिन्यात देशाला युध्दाला सामोरे जावे लागेल, असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला.

रशीयाचे तेल भारत विकत आहे. यातून जगभरातील देशांचे भारतासोबत भांडण होत आहे. दरवर्षाला ४४ हजार कोटीचा हा नफा आहे. तो रिलायंस कंपनीच्या तिजोरीत जात असल्याचा आरोप करीत याच व्यवहारातून युक्रेनचे युध्द सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तोट्यातील मेट्रो रेल्वेचा भार महापालिकेवर येणार

पुढील ५ वर्षात मेट्रो रेल्वे मनपाकडे हस्तांतरीत करण्याचे केंद्राचे धोरण आहे. मेट्रो रेल्वे सध्या पावणे दोन हजार कोटीच्या तोटयात आहे. आधीच आथिंक कणा मोडलेल्या मनपाकडे ती हस्तांतरीत झाल्यास साडे पाच हजार कोटीचे बजेट असलेल्या नागपूर मनपाला पावणे दोन हजार कोटीचा तोटा सहन करावा लागेल. हा भार उचलायचा नसेल तर भाजपला मतदान करू नका,असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Ruling Party's Conspiracy to Prevent Opposition Unity: Prakash Ambedkar's Criticism

Web Summary : Prakash Ambedkar accuses BJP and RSS of plotting to eliminate smaller parties and prevent opposition unity. He warns of a potential war due to Modi's policies, criticizes the Reliance oil deal, and highlights the financial burden of the Metro on Nagpur Municipal Corporation, urging voters to reject BJP.
टॅग्स :Nagpur Municipal Corporation Electionनागपूर महानगरपालिका निवडणूक २०२६Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरnagpurनागपूरBJPभाजपा