तेलंगणामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी बीआरएस कार्यालयावर हल्ला केला; फर्निचर पेटवून दिले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 21:12 IST2025-11-02T20:47:34+5:302025-11-02T21:12:06+5:30
तेलंगणामध्ये बीआरएसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद झाला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बीआरएसच्या कार्यालयातील फर्निचर जाळल्याचे समोर आले आहे.

तेलंगणामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी बीआरएस कार्यालयावर हल्ला केला; फर्निचर पेटवून दिले
तेलंगणामध्येकाँग्रेस कार्यकर्त्यांनी बीआरचे कार्यालाची तोडफोड केल्याचे समोर आले. रविवारी खम्मम जिल्ह्यातील मनुगुरु भागात काँग्रेस कार्यकर्त्यांनी बीआरएसच्या स्थानिक कार्यालयावर हल्ला केला. कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली आणि फर्निचर जाळून टाकले.
बीआरएस समर्थकांनी या घटनेचा व्हिडीओ शेअर केला. व्हिडिओमध्ये काँग्रेस कार्यकर्ते झेंडे घेऊन कार्यालयात प्रवेश करताना, घोषणाबाजी करताना आणि हाणामारी करताना दिसत आहेत. बीआरएस कार्यकर्त्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर या संघर्षात काही लोक जखमी झाल्याचा दावा केला आहे.
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
व्हिडिओमध्ये जळणारे फर्निचर, धूर आणि जाळ दिसत आहेत. तसेच कार्यालयावर काँग्रेसचा ध्वज फडकवल्याचेही दाखवण्यात आले आहे.
"काँग्रेस म्हणजे जुलूम आणि दडपशाही. काँग्रेसचे कार्यकर्ते एका हातात संविधान धरतात आणि दुसऱ्या हातात संवैधानिक मूल्यांची हत्या करतात. जर तुम्ही अशा प्रकारच्या गुंडगिरी आणि धमकीने लोकांना दडपण्याचा प्रयत्न केला तर तो दिवस येईल जेव्हा जनता स्वतः काँग्रेस नेत्यांना फाशी देईल," असे बीआरएसने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
'बीआरएस सरकारच्या काळात त्यांच्या कार्यालयावर जबरदस्तीने कब्जा करण्यात आला होता म्हणून त्यांनी ही कारवाई केली. तत्कालीन आमदारांनी पोलिसांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यालय ताब्यात घेतला होता असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला.
భద్రాద్రి కొత్తగూడెం జిల్లాలో కాంగ్రెస్ గూండాల బరితెగింపు!
— BRS Party (@BRSparty) November 2, 2025
మణుగూరు బీఆర్ఎస్ కార్యాలయంపై కాంగ్రెస్ కార్యకర్తల దాడి.
ఫ్లెక్సీలు చింపి, హంగామా సృష్టించిన కాంగ్రెస్ గూండాలు.. ఫర్నిచర్ ధ్వంసం చేసి, కార్యాలయానికి నిప్పు పెట్టిన కాంగ్రెస్ రౌడీలు.
కాంగ్రెస్ రౌడీలు పక్కా ప్రణాళిక… pic.twitter.com/Tcpg4rv36Y