शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

ज्यांनी राजा केले त्यांच्याच डोक्यावर पाय ठेवला; विजय वडेट्टीवार यांची CM एकनाथ शिंदे यांच्यावर टीका

By कमलेश वानखेडे | Updated: April 8, 2024 16:12 IST

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

कमलेश वानखेडे, नागपूर : मावळ्याचा सरदार केला, सरदारचा जहागिरदार केला. आता तेच राजा होण्याचे स्वप्न पाहत आहे. ज्यांनी राजा केला त्यांच्याच डोक्यावर पाय ठेवत आहे. जनता हे सहन करणार नाही, कोण शिवसेना वाचवतो हे येणारा काळ आणि जनता ठरवेल, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

सोमवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सत्ता टिकवण्यासाठी पंतप्रधानांच्या कितीही सभा घेतल्या तरी जनता त्यांना स्वीकारणार नाही. लोक त्यांना ऐकायला जातील पण मतदान करणार नाहीत. एकनाथ खडसे यांच्या गळ्याला फास लागला आहे. या वयात अधिक त्रास सहन करण्यापेक्षा मानसिक त्रासामुळे बदल करण्याची भूमिका खडसे यांनी घेतली असावी, असे वडेट्टीवार म्हणाले. 

सांगलीबाबत टोकाची भूमिका घेऊन नये, मार्ग काढू असे नाना पटोले बोलले आहेत. संजय राऊत यानी आघाडी धर्म पाळताना सामंजस्याने भूमिका ठेवावी. खा. नवनीत राणा या शरद पवार सारख्या जेष्ठ नेत्याचा आशिर्वाद व काँग्रेसच्या मतांमुळे निवडून आल्या होत्या. आता त्यांची भूमिका बदलली. त्यामुळे लोक यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. संजय निरुपम यांना काँग्रेसने पक्षातून काढून टाकले आहे. ते कुठे जातात याच्याशी आता काँग्रेसला काही देणेघेणे नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.

भाजपमध्ये एकमेकांचा काटा काढणे सुरू

काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात गटबाजी झाली होती. आता काँग्रेस एकसंघ आहे. ही कीड आता भाजपमध्ये सुरू झालेली आहे. उंदराला घुस व्हावं असं वाटतेय. घुशीला बोक्या व्हावे, बोक्याला वाटते की मी त्यापेक्षा चपळ प्राणी व्हावं. राजकारणात एखाद्याचा काटा काढला की दुसऱ्याचा काटा काढला जातोच. भाजपमध्ये महाराष्ट्रात ही स्पर्धा सुरू झालेली आहे. आता हे काटा काढण्यासाठी दाबन वापरतात की सुई हे येत्या काही दिवसात कळेल, असा चिमटाही वडेट्टीवार यांनी घेतला.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारEknath Shindeएकनाथ शिंदेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४