शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

जब जब मोदी डरता है, ईडी सामने करता है; नागपुरात काँग्रेसचे आंदोलन, जोरदार घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2022 13:27 IST

काँग्रेस नेते वसंत पुरके यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत बोलतात, मात्र पत्रकारांसोबत बोलत नाहीत असेही ते म्हणाले.

नागपूर : केंद्रातील मोदी सरकारकडून सुरू असलेल्या ईडीच्या कारवायांविरोधात प्रदेश काँग्रेसच्यावतीने आज (दि. १३), राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. नागपुरातील सिव्हिल लाइन्स येथील ईडीच्या कार्यालयासमोर आंदोलनास सुरुवात झाली आहे. आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत. जब जब मोदी डरता है, ईडी सामने करता है, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी, काँग्रेस नेते वसंत पुरके यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत बोलतात, मात्र पत्रकारांसोबत बोलत नाहीत असेही ते म्हणाले.

केंद्रातील भाजपाप्रणित मोदी सरकारच्या काळात वाढलेली महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार आणि शेतकरी विरोधी धोरणासह काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व नेते खा. राहुल गांधी यांना हेतूपुरस्सरपणे सक्तवसुली संचालनालयाची नोटीस (ईडी) बजावल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात मुंबईत तर नागपुरात ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत असून काँग्रेसचे इतर नेते दाखल झाले आहेत. मंत्री विजय वडेट्टीवार, माजी आमदार सुनील देशमुख, माजी आमदार वसंत पुरके, शिवाजीराव मोघे, अविनाश राजूरकर आदी आंदोलनस्थळी पोहोचले असून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत. 

दरम्यान, 'नॅशनल हेराल्ड'शी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने राहुल गांधींना चौकशीसाठी बोलावले आहे. तपास एजन्सीने यापूर्वी राहुल गांधींना २ जून रोजी हजर राहण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी देशाबाहेर असल्याचे सांगून हजर राहण्यासाठी आणखी दिवसांची मुदत मागितली. याच प्रकरणी तपास यंत्रणेने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना २३ जून रोजी समन्स बजावले आहे. यापूर्वी त्यांना ८ जून रोजी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र, काँग्रेस अध्यक्षांना कोरोनाची लागण झाल्याने वेळ मागितला आहे. राहुल गांधी ईडीच्या कार्यालयाकडे रवाना झाले असून याविरोधात काँग्रस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. 

टॅग्स :agitationआंदोलनcongressकाँग्रेसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयnagpurनागपूरNitin Rautनितीन राऊत