अ.भा. काँग्रेस समितीवर विदर्भाचा बोलबाला, माजी मंत्र्यांसह नव्या दम्याच्या नेत्यांनाही संधी

By कमलेश वानखेडे | Published: February 21, 2023 04:15 PM2023-02-21T16:15:51+5:302023-02-21T16:16:44+5:30

पटोले, राऊत, वडेट्टीवार यांच्यासह ठाकरे, वंजारी, ओझा यांचीही निवड

Congress releases list of All India Congress Committee : Nana Patole, Nitin Raut, Vijay Wadettiwar, Vikas Thackeray, Abhijit Wanjari, Ramkishan Ojha featured in the list | अ.भा. काँग्रेस समितीवर विदर्भाचा बोलबाला, माजी मंत्र्यांसह नव्या दम्याच्या नेत्यांनाही संधी

अ.भा. काँग्रेस समितीवर विदर्भाचा बोलबाला, माजी मंत्र्यांसह नव्या दम्याच्या नेत्यांनाही संधी

googlenewsNext

नागपूर : अ.भा. काँग्रेस समितीचे अधिवेशन २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान रायपूर येथे होत असून या अधिवेशनापूर्वी अ.भा. प्रतिनिधींची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत विदर्भातील बहुतांश नेत्यांच्या स्थान मिळालेले आहे. माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक, विलास मुत्तेमवार, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह विदर्भातील बहुतांश माजी मंत्री व नव्या दमाच्या नेत्यांची निवड करण्यात आली आहे.

रायपूर येथे अ.भा. काँग्रेस समितीचे अधिवेशन होत असले तरी राज्यातील अ..भा. प्रतिनिधींची यादी जाहीर झाली नाही, याकडे लोकमतने लक्ष वेधले होते. शेवटी यादी जाहीर झाल्याने आता या सर्व नेत्यांच्या रायपूर अधिवेशनात सहभागी होता येणार आहे. अ.भा. काँग्रेस प्रतिनिधींच्या यादीचे परीक्षण केले असता या यादीत विदर्भाला झुकते माप देण्यात आल्याचे दिसून येते.

विदर्भातील प्रत्येक जिल्ह्याला प्रतिनिधित्व देण्यासोबतच जातीय समतोल साधण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. अ.भा. काँग्रेस समितीचे प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ नेते अविनाश पांडे यांच्यासह अविनाश पांडे, माणिकराव ठाकरे, रणजित देशमुख, शिवाजीराव मोघे, खा. सुरेश धानोरकर, वंसत पुरके, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, नितीन राऊत, सुनील केदार, विकास ठाकरे, विरेंद्र जगताप, सुनील देशमुख, राहुल बोंद्रे, रणजित कांबळे, अमर काळे, सुभाष धोटे, चारुलता टोकस, अभिजित वंजारी, रामकिशन ओझा, किशोर गजभिये, अतुल लोंढे, हर्षवर्धन सपकाळ आदींची निवड करण्यात आली आहे.

स्वीकृत सदस्यांमध्येही झुकते माप

- अ.भा. काँग्रेस समितीवर नेमण्यात आलेल्या स्वीकृत सदस्यांच्या यादीतही नागपूरसह विदर्भाला झुकते माप मिळाले आहे. माी मंत्री अनिस अहमद, महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष संध्या सव्वालाखे, आ. वझाहत मिर्झा, कुणाल राऊत, प्रफुल्ल गुडधे, अभिजत सपकाळ, नितीन कुंभलकर यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाली आहे.

Web Title: Congress releases list of All India Congress Committee : Nana Patole, Nitin Raut, Vijay Wadettiwar, Vikas Thackeray, Abhijit Wanjari, Ramkishan Ojha featured in the list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.