नागपुरात पेट्रोल दरवाढीविरुद्ध काँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 20:33 IST2020-07-11T20:31:36+5:302020-07-11T20:33:02+5:30
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरुद्ध महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यभर धरणे व निदर्शने करण्यात आली. पूर्व नागपुरात वर्धमान नगर येथील पेट्रोल पंपासमोर निदर्शने करण्यात आली.

नागपुरात पेट्रोल दरवाढीविरुद्ध काँग्रेसची निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरुद्ध महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यभर धरणे व निदर्शने करण्यात आली. पूर्व नागपुरात वर्धमान नगर येथील पेट्रोल पंपासमोर निदर्शने करण्यात आली.
२०१४ पूर्वी काँग्रेसचे सरकार असताना भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय स्तरावरील सर्व नेत्यांनी रस्त्यावर उतरून पेट्रोल व डिझेल दरवाढीविरुद्ध आंदोलन केले होते. त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव १४७ डॉलर प्रति बॅरल होते. त्यावेळी पेट्रोल व डिझेलचे भाव ७० रुपयांच्या आत होते. मागील चार वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव ४५ रुपये प्रती बॅरल असताना भाजप सरकारने ३०० टक्क्याने पेट्रोल व डिझेलवर अतिरिक्त अबकारी कर लावून जनतेची लूट चालविली असल्याचा आरोप आंदोलनादरम्यान करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करीत पेट्रोल व डिझेल दरवाढीविरुद्ध निषेध नोंदविला. आंदोलनात काँग्रेस नेते अभिजित वंजारी, ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे, युवराज वैद्य, राजेश पौनीकर, शहर काँग्रेस कमिटीचे मिलिंद दुपारे, राकेश कनोजे, निर्मला बोरकर, महेश वैरागडे, राजेश ढेंगे, राजू यादव, विजय बोरकर, रामदेव अग्रवाल, मनोज नौकरकर, मनीष उमरेडकर, कुसुम बावनकर, अंकुश भोवते, सरफराज खान, शैलेश कांबळे, सतीश हटवार, लक्ष्मीनारायण चड्डा, राजेश अग्रवाल, पुरुषोत्तम लोणारे, प्रदीप खानोरकर, मृणाल हेडाऊ, मुकेश पौनिकर, संजय मेंढे, कुमारेश अवचट, धनराज अतकरी आदींनी भाग घेतला.