ग्राम पंचायत निकालासंदर्भात भाजपची बनवाबनवी; नाना पटोलेंची खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 13:40 IST2022-12-20T13:39:00+5:302022-12-20T13:40:55+5:30
खोटारडे सरकार सरपंचपदाचीही खोटी आकडेवारी देताहेत - पटोलेंची टीका

ग्राम पंचायत निकालासंदर्भात भाजपची बनवाबनवी; नाना पटोलेंची खोचक टीका
नागपूर : महाराष्ट्रातील ईडी सरकार खोटारडे असून सरपंचपदाच्या निवडणुकीत खोटे आकडेवारी करून ते जनतेची दिशाभूल करीत आहेत. भाजपवाले, दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला तर हे पेढे वाटून आनंद व्यक्त करताहेत अशी खोचक टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना केली.
महाविकास आघाडीचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले असून राज्यात काँग्रेसने ९०० तर नागपूरमध्ये २००च्या वर जागा जिंकल्या असल्याचा दावा पटोले यांनी केलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लाडू वाटण्याच्या अगोदर खरी आकडेवारी जनतेसमोर मांडावी, खोटी आकडेवारी देऊन जनतेची फसवणूक करू नये, हे सरकार विधानसभेतही खोटे बोलते व प्रसिद्धी माध्यमांसमोरही खोटे बोलत असल्याचा दावा पटोले यांनी केला.
ग्रामपंचायत निवडणुकीचा विधानभवन परिसरातील भाजप कार्यालयात जल्लोष
दरम्यान, भाजपने साडेतीन हजार ग्रामपंचायतीत दावा केला असून शिंदेंच्या शिवसेनेनेही एक हजार ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे, असे दावा करून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विजयाचा जल्लोष विधानभवन परिसरात लाडू वाटून केला.