शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात संतप्त नागरिकांचा गोंधळ

By admin | Updated: April 20, 2016 03:24 IST

पाणी समस्येबाबत जिल्हा प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केली जात नसल्याची भावना झाल्यामुळे संतप्त झालेल्या वाडीतील ...

नागपूर : पाणी समस्येबाबत जिल्हा प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केली जात नसल्याची भावना झाल्यामुळे संतप्त झालेल्या वाडीतील नागरिकांनी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या कक्षात सोमवारी दुपारी गोंधळ घातला. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र रामभाऊ कुंभारे (वय ५४) यांनी सदर पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी दुपारी २ च्या सुमारास जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या कक्षात अस्मिता प्रणय मेश्राम, नरेंद्र मेंढे, मंगला वाघमारे. मंजुळा चौधरी, आशिष नंदागवळी, प्रमोद भोवरे, प्रज्ञा वासनिक, मनोज भांगे यांच्यासोबत आणखी १५ ते २० जण आले. त्यांनी वाडीतील पाणी प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांशी वाद घालणे सुरू केले. प्रशासकीय अडचणीवर मात करून आपण या प्रश्नावर तातडीने मार्ग काढू असे जिल्हाधिकारी समजावत होते. मात्र, आरोपी नुसते आरडाओरड करून गोंधळ करीत होते. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी असभ्य वर्तन केले. त्यामुळे तणाव निर्माण झाला. या प्रकाराची सदर पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही फुटेज आणि कार्यालयातील प्रत्यक्षदर्शींचे आज पोलिसांनी बयाण नोंदविले. या प्रकरणात आरोपींपैकी किती जणांनी गोंधळ घातला, त्याची पोलीस चौकशी करीत आहेत. (प्रतिनिधी)