नागपूर शहरातील प्रमुख पाच तलावांची स्थिती अत्यंत वाईट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 12:00 AM2021-03-25T00:00:53+5:302021-03-25T00:02:20+5:30

Condition of five major lakes in Nagpur city is very bad नीरीचा अहवाल तलावांबाबत चिंता करायला भाग पाडणारा आहे. फुटाळा, गांधीसागर, सोनेगाव तलावांनी प्रदूषणाची सीमा पार केली आहे. सक्करदरा व नाईक तलावांचे अस्तित्वच संकटात आहे. केवळ अंबाझरी तलावाची स्थिती समाधानकारक आहे.

The condition of five major lakes in Nagpur city is very bad | नागपूर शहरातील प्रमुख पाच तलावांची स्थिती अत्यंत वाईट 

नागपूर शहरातील प्रमुख पाच तलावांची स्थिती अत्यंत वाईट 

googlenewsNext
ठळक मुद्देनीरीचा अहवाल : सक्करदरा, नाईक तलाव धोक्यात, अंबाझरी ठिकठाक

 लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : आपण विचार करीत नसलो तरी शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या एक एक गोष्टी गमावत चाललो आहे, हे मानावे लागेल. तलावांच्या बाबतीत हेच होत आहे. कुठल्याही शहराला असे वैभव मिळाले नाही पण संवर्धनासाठी गांभीर्य दाखवणे आवश्यक आहे. तलावांच्या बाबतीत अशीच अवस्था आहे. नीरीचा अहवाल तलावांबाबत चिंता करायला भाग पाडणारा आहे. फुटाळा, गांधीसागर, सोनेगाव तलावांनी प्रदूषणाची सीमा पार केली आहे. सक्करदरा व नाईक तलावांचे अस्तित्वच संकटात आहे. केवळ अंबाझरी तलावाची स्थिती समाधानकारक आहे.

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) ने २०१९-२० चा शहराचा पर्यावरण स्थिती अहवाल महापालिकेला सादर केला आहे. यात अभ्यासलेली तलावांची स्थिती चिंताजनक आहे. सर्व तलावांचे सर्व प्रकारचे प्रदूषण वाढीस लागले आहे. गढूळपणा, आम्लपणा, पाण्याची कठीणता, सल्फेट, नायट्रेट, फॉस्फेट, धातू-अधातूंचे प्रमाण, सीओडी, बीओडी आणि कॉलिफॉर्म आदी सर्व प्रकारच्या घटकांची तलावांच्या पाण्यात वाढ झाली आहे. घराघरातील सिवेज, गटार आणि फेकला जाणारा कचरा हे या प्रदूषणाचे प्रमुख कारण आहेत.

- नीरीच्या टीमने प्रत्येक तलावातून वरच्या स्तराची व खोलातील नमुन्यांची सखोल तपासणी करून हा अहवाल तयार केला आहे.

अभ्यासातील महत्त्वपूर्ण बाबी

- सर्व तलावांचे पीएच लेव्हल ६.९ ते ८.५ च्या दरम्यान आहे.

- गढूळपणा ५ ते १०० एनटीयूपर्यंत म्हणजे सामान्यपेक्षा कितीतरी अधिक.

- सल्फेट/नायट्रेट ३६ ते १८६ व ३ ते ४० मिग्रॅ/लिटरच्या रेंजमध्ये.

- सीओडी २५ ते १४० मिग्रॅ/लिटर तर बीओडी ४.६ ते ८० मिग्रॅ/लिटर.

- फुटाळ्यात सीओडी १६ ते ४० मिग्रॅ/लि. व बीओडी ६-२० मिग्रॅ/लि.

- फुटाळ्याचा आम्लपणा २२० ते ३४८ मिग्रॅ/लिटर, गढूळपणा १० एनटीयू. सल्फेट/नायट्रेट ६५ ते ८८ मिग्रॅ/लिटर.

तलावांनुसार स्थिती

- अंबाझरी तलावात मासे व जैवविविधतेचे समाधानकारक अस्तित्व.

- नाईक तलावात विरघळलेल्या घनपदार्थांचे प्रमाण २००० मिग्रॅ/ली.च्यावर

- सर्व तलावांत कॉलिफॉर्मचे प्रमाण अधिक. कॉलिफॉर्म मानवी शरीरातील घटक असून त्याच्या असण्याने सिवेज वाहत असल्याचे लक्षात येते.

- नाईक तलावात कॉलिफॉर्म ४८० ते ४९० मिग्रॅ/लि. अत्याधिक धोक्यात.

- सोनेगाव, गांधीसागर, अंबाझरीमध्ये सीओडी व बीओडी अधिक.

- सक्करदरा, गांधीसागरमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फ्लोराईड, क्लोराईड आदी पोषण घटकांचे प्रमाण अत्याधिक.

- सर्व तलावांमध्ये मेटल्सचे प्रमाणही वाढत आहे.

Web Title: The condition of five major lakes in Nagpur city is very bad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.