शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अपघातमुक्त नागपूर ही संकल्पना राज्यात राबविणार

By admin | Updated: January 11, 2015 00:51 IST

अपघातमुक्त नागपूर ही संकल्पना महाराष्ट्रात राबविण्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज शनिवारी केली. झाशी राणी चौकात रोटरी क्लब आॅफ नागपूर एलिट,

परिवहन मंत्र्यांची घोषणा : अपघातमुक्त नागपूर अभियानाचा शुभारंभ नागपूर : अपघातमुक्त नागपूर ही संकल्पना महाराष्ट्रात राबविण्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज शनिवारी केली. झाशी राणी चौकात रोटरी क्लब आॅफ नागपूर एलिट, वोक्हार्ट हॉस्पिटल व जीवन सुरक्षा प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अपघातमुक्त नागपूर अभियानाचा शुभारंभ दिवाकर रावते यांनी केला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) सर्जेराव शेळके, प्रादेशिक परिवहन अधिकारी (ग्रामीण) शरद जिचकार, सामाजिक कार्यकर्ता संजय मेश्राम, रोटरी क्लबचे अध्यक्ष अविनाश पाठक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, रवंीद्र भुयार, पंकज वैशंपायन, राजू वाघ, प्रसिद्ध व्यावसायिक आशुतोष शेवाळकर व्यासपीठावर उपस्थित होते.अपघातामुळे जगाची अर्थव्यवस्था खिळखिळी पडते म्हणून जगातील सर्व देशात व भारतातील सर्व राज्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्याचा निर्णय युनो संघटनेने घेतला, अशी माहिती देत परिवहन मंत्र्यांनी यावेळी अपघात टाळण्यासाठी सामाजिक संघटनांनी जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. पाठक यांनी अपघातमुक्त नागपूर अभियानाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, नागपुरात गेल्या वर्षभरात १३०० वर अपघाताची नोंद झाली आहे. यामुळे हे अभियान वर्षभर राबविण्यात येईल, असेही ते म्हणाले. शेळके यांनी ११ जानेवारीपासून राबविण्यात येणाऱ्या रस्ता सुरक्षा अभियानाची माहिती दिली. ते म्हणाले, परिवहन विभागातर्फेवाहनचालकांना वाहन चालविण्याचा परवाना दिल्यानंतरही त्यांना रस्ता सुरक्षेचे प्रशिक्षण देण्यात येते. आतापर्यंत गेल्या वर्षभरात ३५ हजार वाहनचालकांना याचे प्रशिक्षण दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी वाहतूक नियमांच्या माहिती देणाऱ्या पत्रकाचे प्रकाशन परिवहन मंत्र्यांनी केले. आज देण्यात आलेली शपथ एका मोठ्या फलकावर लिहिण्यात आली होती. त्यावर परिवहन मंत्र्यासह मान्यवरांनी स्वाक्षरी केली. संचालन रोटरीचे सचिव जयंत दीक्षित यांनी केले. कार्यक्रमाला सहायक मोटार वाहन निरीक्षक सुबोध देशपांडे, राजेश निकोसे, मोटार वाहन निरीक्षक विजय सोळसे, संजय फेंडारकर, नीलेश लोखंडे, प्रकल्प संयोजक निशांत बिर्ला, प्रशांत पिपळवार, श्रीनिवास वरंमे, ललित लोया, डॉ. वंदना टोमे, शरद बागडी, प्रमोद तभाने, अमित हाजियानी, धनंजय कोंडावार उपस्थित होते. (प्रतिनिधी)