शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

आमसभेचे निमंत्रण नसल्याची सदस्यांची तक्रार

By admin | Updated: September 30, 2014 00:37 IST

अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेची आमसभा आज शांततेत पार पडली. विषयपत्रिकेवर ठेवलेले विषय सर्व सदस्यांच्या संमतीने मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे आमसभेत नेहमीच

नाट्य परिषद : आमसभा शांततेतनागपूर : अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेची आमसभा आज शांततेत पार पडली. विषयपत्रिकेवर ठेवलेले विषय सर्व सदस्यांच्या संमतीने मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे आमसभेत नेहमीच सदस्यांचे आक्षेप आणि वादप्रवाद होतात पण या आमसभेत प्रत्येकच विषय तत्काळ मंजूर होत गेल्याने अवघ्या १५ मिनिटात आमसभा संपली. इतिवृत्त वाचन, अहवाल वाचन, आॅडिटर नेमणे, आलेल्या पत्रांची उत्तरे देणे आदी विषय पत्रिकेवर ठेवण्यात आले होते. यावेळी हिशेबही सांगण्यात आला पण सदस्यांना तो मंजूर करावाच लागला. कारण हिशेबाचा सारा अहवाल थेट बैठकीतच देण्यात आल्याने त्याची तपासणी सदस्यांना करता आली नाही. किमान दोन दिवस आधी हिशेब मिळाला असता तर त्याचा अभ्यास करून त्यावर बोलता आले असते, असे मत काही सदस्यांनी व्यक्त केले. आमसभेचे निमंत्रणच अनेकांना न मिळाल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली पण एका वृत्तपत्रात जाहिरात दिली होती, असे अध्यक्ष प्रफुल्ल फरकसे यांनी सांगितल्यावर त्यावर कुणी आक्षेप घेतला नाही. कार्यकारिणी २९ वरून १५ ची करण्यात आल्यानंतर उर्वरित सदस्यांना निमंत्रित सदस्य म्हणून स्थान देण्यात आले. पण या निमंत्रित सदस्यांना आमसभेचे निमंत्रण पाठविण्याची तसदी नाट्य परिषदेने न घेतल्याने निमंत्रित सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रफुल्ल फरकसे यांनी आमसभा शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात झाल्याचे सांगितले. दीपरंग नाट्य महोत्सवाच्या आयोजनाबाबत यावेळी फरकसे यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा करण्यात आली. दिवाळी नंतर आणि राज्य नाट्य महोत्सवाच्या पूर्वी हा महोत्सव आयोजित करण्यासाठी कार्यकारिणी सदस्यांपैकी एकाची प्रकल्प संयोजक म्हणून नेमणूक करायची असे ठरले. याप्रसंगी फरकसे यांनी रमण सेनाड यांना प्रकल्प संयोजक करण्याची शिफारस केली. त्यांच्या या मताला सर्वांनीच दुजोरा दिला. यंदा हा महोत्सव दर्जेदार पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला. जास्त प्रवेशिका आल्यास दीपरंग महोत्सव तीन दिवसांऐवजी पाच दिवस करण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली. (प्रतिनिधी)