कोरोना बाधित आढळल्यामुळे ती कंपनी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 22:20 IST2020-06-13T22:18:15+5:302020-06-13T22:20:54+5:30
डिगडोह येथील हसीब फार्मास्युटिकल कंपनीत तीन कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे पुढील आदेशापर्यंत कंपनी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

कोरोना बाधित आढळल्यामुळे ती कंपनी बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डिगडोह येथील हसीब फार्मास्युटिकल कंपनीत तीन कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे पुढील आदेशापर्यंत कंपनी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.
ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असून नागरिक व उद्योग समूहांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, हिंगणा, बुटीबोरी, कळमेश्वर आदी क्षेत्रात उद्योग सुरू करताना फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व सॅनिटायझर बंधनकारक करण्यात आले आहे, नियमाचे पालन न करणाऱ्या कंपन्यांविरुध्द कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
मौझा भीमनगर, ईसासनी, हिंगणा येथे तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, हे तिन्ही हसीब फार्मास्युटिकल येथील कर्मचारी आहेत, हिंगणा तहसीलदार संतोष खंडारे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत ही कारवाई केली. उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली आहे.