शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
2
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
3
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
4
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
5
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
6
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
7
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
8
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
9
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
10
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
11
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
12
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
13
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
14
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
15
Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
16
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
17
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
18
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
19
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
20
Beauty Jha : संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
Daily Top 2Weekly Top 5

महानगरपालिका निवडणुकीत जप्त रोख रकमेवर समिती घेणार निर्णय; आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 17:17 IST

Nagpur : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी १६ जानेवारीपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या कालावधीत कागदपत्रांशिवाय निर्धारित रकमेपेक्षा जास्त रोख रक्कम आढळून आल्यास गठित समिती यावर निर्णय घेणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी १६ जानेवारीपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या कालावधीत कागदपत्रांशिवाय निर्धारित रकमेपेक्षा जास्त रोख रक्कम आढळून आल्यास गठित समिती यावर निर्णय घेणार आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर मनपाच्या आचारसंहिता कक्षाच्या भरारी पथकासह (एफएसटी) आणि स्थिर निगराणी पथकाद्वारे (एसएसटी) कारवाई केली जात आहे.

कारवाईदरम्यान पथकांद्वारे विविध ठिकाणी रोकड व इतर अनुषंगिक वस्तू जप्त केल्या जात असून, कक्षाकडून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंच्या विल्हेवाटीसाठी मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या आदेशानुसार मनपाच्या अतिरिक्त आयुक्त तथा आचारसंहिता नियंत्रण अधिकारी वैष्णवी बी. यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समिती गठित करण्यात आली आहे. 

समितीत उपजिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्ष प्रमुख विजय पवार यांची सदस्य म्हणून, तर मनपाचे प्रमुख लेखा व वित्त अधिकारी तथा खर्च देखरेखीचे नोडल अधिकारी सदाशिव शेळके यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच समितीत सदस्य म्हणून निवडणूक खर्च कक्ष प्रमुख तथा उपमुख्य लेखा वित्त अधिकारी, जिल्हा परिषद सूरज कोषागार अधिकारी मोनाली भोयर आदींची समिती गठित करण्यात आली आहे.

सार्वत्रिक २०२५-२६ दरम्यान नागपूर महानगरपालिका निवडणूक आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व खर्चावर नियंत्रण ठेवणे, आर्थिक बळाचा दुरूपयोग टाळणे, मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तूंच्या वाटपावर अंकुश ठेवण्याकरिता आचारसंहिता कक्ष कार्य करीत आहे. कक्षाच्या भरारी पथकासह (एफएसटी) आणि स्थिर निगराणी (एसएसटी) पथकांकडून निवडणुकी काळात वाहन तपासणी केली जात आहे.

कागदपत्रे सादर केली तरच मिळणार परत रक्कम

  • तपासणीत निर्धारित रकमेपेक्षा अधिक रक्कम व अनुषंगिक वस्तू आढळल्यास संबंधिताकडून आवश्यक ती कागदपत्रे मागितली जात आहेत.
  • संबंधित व्यक्ती कागदपत्रे व आवश्यक माहिती पुरविण्यास असमर्थ असल्यास आढळलेली रोकड थेट ताब्यात घेतली जाते. रोकड ताब्यात घेतल्यानंतर त्या रकमेबाबत पुढील चौकशी पोलिस आणि आयकर विभागामार्फत केली जाते.
  • चौकशीदरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या रोकड 3 रकमेबाबत योग्य ती कागदपत्रे सादर केल्यास चौकशीनंतर ही रोकड व अनुषंगिक वस्तू संबंधितांना परत करण्याबाबत निर्णय गठित संनियंत्रण समितीद्वारे घेण्यात येईल.
  • आचारसंहिता कक्ष प्रमुख विजय पवार यांचा भ्रमणध्वनी क्र. ७९७२४९०९६८ असून, या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
English
हिंदी सारांश
Web Title : Committee to Decide on Seized Cash in Election; Action on Violators

Web Summary : A committee will decide on seized cash during the municipal election. Action will be taken against code of conduct violators by flying squads and static surveillance teams. Nagpur Municipal Corporation has formed a monitoring committee for disposal of seized items, ensuring fair elections.
टॅग्स :Nagpur Municipal Corporation Electionनागपूर महानगरपालिका निवडणूक २०२६Electionनिवडणूक 2026nagpurनागपूर