शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
3
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
7
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
8
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
9
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
10
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
11
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
12
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
13
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
14
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
16
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
17
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
18
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
19
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
20
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
Daily Top 2Weekly Top 5

पंचम-गुलजार शब्दस्वरांचा रंगलेला काफिला

By admin | Updated: February 9, 2015 00:57 IST

पंचमदा अर्थात आर. डी. बर्मन म्हणजे संगीताचे बादशहाच. त्यांचे संगीत म्हणजे जादुई होते. कधी काळजात रुतुन बसणारे तर कधी मस्तीत थिरकायला भाग पाडणारेही.

लोकमत सखी मंच व हार्मोनी इव्हेंट्सचे आयोजन : दर्जेदार गीतसंगीताने रसिक मंत्रमुग्ध नागपूर : पंचमदा अर्थात आर. डी. बर्मन म्हणजे संगीताचे बादशहाच. त्यांचे संगीत म्हणजे जादुई होते. कधी काळजात रुतुन बसणारे तर कधी मस्तीत थिरकायला भाग पाडणारेही. पण पंचमदांच्या गींतांमध्ये जीवनाचा अर्थ होता आणि जगण्याचे तत्त्वज्ञान होते. त्यात गुलजार म्हणजे अनवट शब्दांनी सहजपणे जीवनातल्या अनुभवांना भिडणारे. हा अनुभव आपलाच आहे, इतका जवळचा वाटावा अशा त्यांच्या रचना रसिकांना वेड लावणाऱ्या. पंचमदांचे संगीत आणि गुलजार यांची रचना यांचा मिलाफ झाला आणि चित्रपट संगीताचे सुवर्णयुगच जन्माला आले. थेट हृदयाला हात घालणाऱ्या गीतांनी तब्बल चार पिढ्यांना वेड लावले. पंचम आणि गुलजार स्वरांचा काफिला रंगला तेव्हा रसिक त्यात हरविले. याचा प्रत्यय आज डॉ. देशपांडे सभागृहात आला. लोकमत सखी मंच आणि हार्मोनि इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पंचम - गुलजार’ या कार्यक्रमाचे दोन प्रयोग आज डॉ. देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आले. या दोन्ही प्रयोगांना नागपूरकर रसिकांनी खच्चून गर्दी केली. वन्समोअरची दाद आणि टाळ्यांचा प्रतिसाद देत हा कार्यक्रम रसिकांसाठी अविस्मरणीय ठरला. या कार्यक्रमाला स्वर्णिम डेव्हलपर्सचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचा प्रारंभ प्रमुख अतिथी डॉ. दंदे फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. पिनाक दंदे यांनी दीपप्रज्वलनाने केला. याप्रसंगी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, प्रचिती महिला अर्बन क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्ष संगीता देशमुख, रेखा उराडे, शैलेश बावने, अश्विनी झिलपे, भूषण बोंडे, प्रेमा बोंडे, म्हाडाचे अभियंता विवेक उमाळकर, हार्मोनी इव्हेंट्सचे राजेश समर्थ, माजी मंत्री रणजित देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. पिनाक दंदे यांनी लोकमतच्या या उपक्रमाची प्रशंसा केली. कलावंतांना प्रोत्साहन देण्याचे काम लोकमत सातत्याने करीत असल्याबद्दल त्यांनी लोकमतचे अभिनंदन करुन सर्व कलावंतांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाची संकल्पना, संयोजन राजेश समर्थ यांचेच होते. यानंतर मात्र पंचम आणि गुलजार या जोडगोळीने अजरामर केलेल्या गीतांचा सिलसिला सारे वातावरण व्यापून उरला. नागपूरचा किशोरकुमार म्हणून रसिकांच्या गळ्यातला ताईत असलेल्या सागर मधुमटकेने ‘मुसाफिर हुं यारो...’ या गीताने कार्यक्रमाला प्रारंभ केला आणि उत्सुकता ताणलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिसादाने हा कार्यक्रम बहरत गेला. यानंतर विविध वाहिन्यांवरील रिअ‍ॅलिटी शो जिंकणारी संगीतरत्न पुरस्कारप्राप्त आकांक्षा नगरकर - देशमुख हिने सिली हवा छु गयी...या गीताने समाँ बांधला. तर त्यानंतर शहरातील गुणी गायिका श्रीनिधी घटाटेने ‘आज कल पांव जमी पर नही पडते मेरे...’ या घर चित्रपटातल्या गीताने रसिकांना दाद द्यायला भाग पाडले. चिरंतन देशमुख यांनी ‘कोई होता जिसको अपना हम अपना कह लेते यारो..’ या गीताने प्रेक्षकांना जिंकले. सागर मधुमटके, चिरंतन देशमुख, आकांक्षा नगरकर आणि श्रीनिधी घटाटे यांच्या दमदार आणि तयारीच्या सादरीकरणाने तर वाद्यवृंदातील तयारीच्या वादकांच्या साथीने हा कार्यक्रम केवळ अविस्मरणीयच ठरला. यातील गीतांची निवड चोखंदळपणे करण्यात आली होती. याशिवाय गीत सादरीकरण करताना त्या गीताचा आशय, भावना तितक्याच हळुवारपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी याची विशेष काळजी घेण्यात आल्याने इतर कार्यक्रमांच्या तुलनेत हा कार्यक्रम एक वेगळी उंची गाठणारा होता. सागर मधुमटकेने यावेळी ‘तुम आ गये हो नुर आ गया है..., मै हु झुम झुम झुमरु..., आ के सिधी लगी...’ आदी गीतांनी रसिकांचे चांगलेच मनोरंजन केले. आकांक्षा नगरकरने ‘बिती ना बिताई रैना..., तुझसे नाराज नही जिंदगी..., इस मोड से जाते है..., मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है...’ आदी गीते सादर केलीत. तर सागर आणि आकांक्षा यांनी अनेक युगुल गीतांनीही समां बांधला. याप्रसंगी त्यांनी ‘आप की आँखो मे कुछ महके हुए से ख्वॉब है..., गुलमोहर गर तुम्हारा नाम होगा..., चल बैठे चर्च के पिछे...’ आदी गीतांनी खासी रंगत आणली. श्रीनिधी घटाटेनेही ‘नाम गुम जाएगा..., तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही..., दो नैना इक कहानी थोडासा बादल थोडासा पानी...’ आदी गीतांच्या सादरीकरणाने अनेकदा रसिकांचा वन्समोअर घेतला. चिरंतन देशमुख यांनी ‘फिर वही रात है...’आदी गीतांनी रसिकांचे मनोरंजन केले. याप्रसंगी पंचमदा यांनी संगीतात अनेक प्रयोग केले. काही गीते ऱ्हीदमिक तर काही खोल भावनेच्या तळाचा शोध घेणारी होती. याप्रसंगी श्रीनिधीने ‘मिठे बोल बोले बोले पायलिया...’ हे अनोख्या धाटणीचे तर श्रीनिधी आणि आकांक्षा यांनी ‘पिया बावरी....’ हे गीत तयारीने सादर करुन पंचमदांच्या संगीतातील बारकावे दाखविले. (प्रतिनिधी)रसिकांची खच्चून गर्दीलोकमत सखी मंचच्या या कार्यक्रमासाठी रसिकांनी खच्चून गर्दी केली होती. सभागृहात एकही आसन रिकामे नव्हते. अनेक लोक सभागृहाबाहेर आत जाऊ देण्याची विनंती करीत होते पण जागा नसल्याने त्यांना दुसऱ्या कार्यक्रमासाठी विनंती करण्यात आली. प्रामुख्याने लोकमत सखी मंचच्या सदस्य आणि त्यांचे कुटुंबीय यांनी हा कार्यक्रम एन्जॉय केला. अनेकांनी असे कार्यक्रम पुन्हा आयोजित करण्याची विनंती केली. वादकांच्या वाद्यसंगतीने रंगलेला कार्यक्रम या कार्यक्रमात बेस गिटारवर रिंकु निखारे, लीड गिटारवर प्रकाश चव्हाण, सिंथेसायझरवर ज्येष्ठ वादक पवन मानवटकर आणि राजा राठोड, बासरीवर अरविंद उपाध्ये, तबल्यावर प्रशांत नागमोते आणि आॅक्टोपॅडवर नंदू होगाणे यांनी साथसंगत केली. पंचमदांच्या गीतांवर वाद्यसंगीत करणे कठीण आहे. पण सर्व वादकांचा परस्परांशी असणारा समन्वय आणि संवाद या कार्यक्रमाची उंची वाढविणारा होता. विशेषत्वाने आजच्या कार्यक्रमात सर्व वादकांसह प्रशांत नागमोते यांनी ‘मिठे बोल बोले ....’ या गीतावरच्या तबला सादरीकरणाने रसिकांच्या टाळ्या घेतल्या. तबल्याचे संतुलन आणि घुमारा यावर असणारे त्यांचे प्रभुत्व रसिकांनाही आनंद देणारे होते. या कार्यक्रमाचे रसाळ निवेदन राजेश समर्थ यांनी केले. ध्वनिव्यवस्था स्वप्निल उके यांची तर व्हीडीओ मनोज पिदळी यांचे होते. चित्रपटगीतातील दृश्याने रंगत चित्रपट गीत सादर होत असताना त्या गीताचे दृश्य दाखविण्यात असल्याने रसिक या कार्यक्रमात अधिक गुंतले. नॉस्टॅल्जिक झाले. स्मरणरंजनाचा हा सोहळा सुरेल स्वरांनी रंगतदार झाला. यानिमित्ताने अनेक रसिक त्यांच्या पूर्वायुष्यातल्या आठवणींशी जुळले.