दोन अज्ञात दुचाकींची धडक, रस्ता ओलांडणाऱ्या ७८ वर्षीय महिलेचा मृत्यू

By योगेश पांडे | Updated: October 12, 2023 15:10 IST2023-10-12T15:09:49+5:302023-10-12T15:10:11+5:30

मानकापूर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वारांविरोधात गुन्हा दाखल

Collision between two unknown bikes, death of a 78-year-old woman who was crossing the road | दोन अज्ञात दुचाकींची धडक, रस्ता ओलांडणाऱ्या ७८ वर्षीय महिलेचा मृत्यू

दोन अज्ञात दुचाकींची धडक, रस्ता ओलांडणाऱ्या ७८ वर्षीय महिलेचा मृत्यू

नागपूर : दोन भरधाव दुचाकींच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या ७८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

हिरामुनी कुंवरबहादूरसिंह ठाकूर (७८, रोझ कॉलनी, मानकापूर) असे मृतक महिलेचे नाव आहे. ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता त्या उपाध्याय गेस्टहाऊससमोरून रिंग रोड ओलांडत असताना भरधाव वेगात आलेल्या दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी त्यांना धडक दिली. त्यात हिरामुनी गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी मेयो इस्पितळात दाखल करण्यात आले होते. बुधवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचा नातू चेतन आलोकसिंह ठाकूर याच्या तक्रारीवरून मानकापूर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Collision between two unknown bikes, death of a 78-year-old woman who was crossing the road