शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

नागपुरात आपली बसच्या ताफ्यात सीएनजी बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 8:14 PM

डिझेल बसमुळे मोठ्याप्रमाणात प्रदूषण होत असून इंधन खर्चही अधिक आहे. परिवहन सेवा प्रदूषणमुक्त व खर्चात बचत व्हावी, यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेच्या परिवहन विभागाने डिझेलवर धावणाऱ्या बसेस सीएनजीमध्ये परिवर्तित करून चालविण्याचा निर्णय घेतला आहे. परिवर्तित करण्यात आलेली एक बस आपली बसच्या ताफ्यात दाखल झाली आहे.

ठळक मुद्दे५० बसेस सीएनजीमध्ये परिवर्तित करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डिझेल बसमुळे मोठ्याप्रमाणात प्रदूषण होत असून इंधन खर्चही अधिक आहे. परिवहन सेवा प्रदूषणमुक्त व खर्चात बचत व्हावी, यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेच्या परिवहन विभागाने डिझेलवर धावणाऱ्या बसेस सीएनजीमध्ये परिवर्तित करून चालविण्याचा निर्णय घेतला आहे. परिवर्तित करण्यात आलेली एक बस आपली बसच्या ताफ्यात दाखल झाली आहे.देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरातील बसेस सीएनजीवर धावतात. याच धर्तीवर लवकरच नागपूर शहरातील सार्वजनिक परिवहन सेवेतील ५० बसेस सीएनजीवर धावणार आहेत. याबाबतचा करार पुणे येथील रॉमेंट कंपनीने महापालिकेशी केला आहे. याचा महापालिकेवर कोणत्याही स्वरुपाचा आर्थिक बोजा पडणार नाही. सोबतच इंधनावरील खर्च कमी होणार आहे. कंपनी आधी डिझेल बसेस सीएनजीमध्ये परिवर्तित करणार आहे. सोबतच सीएनजी उपलब्ध करणार आहे. परिवहन समितीने यासाठी पुढाकार घेतला होता.परिवहन विभागाला डिझेल बसेस सीएनजीमध्ये परिवर्तित के ल्यानंतर सीएनजी उपलब्ध करण्याबाबतचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र रॉमेंट कंपनीकडून याचा पुरवठा केला जाणार आहे. आपली बसच्या ताफ्यात दाखल झालेल्या सीएनजी बसचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते २ मार्चला होणार असल्याची माहिती परिवहन सभापती बंटी कुकडे यांनी दिली.तोटा कमी होण्याला मदतडिझेलच्या तुलनेत सीएनजी स्वस्त असल्याने परिवहन विभागाचा इंधनावरील खर्च कमी होईल. सीएनजी पर्यावरणपूरक असण्यासोबतच महापालिकेसाठी फायदेशीर ठरणार आहे. यातून परिवहन विभागाचा तोटा काही प्रमाणात कमी होऊ शकतो.सीएनजी डेपो उभारणारआपली बसच्या ताफ्यातील ५० डिझेल बसेस सीएनजीमध्ये परिवर्तीत करण्यात येणार आहे. यासाठी सीएनजीची गरज भासणार असल्याने नागपुरात सीएनजी डेपो उभारला जाणार आहे. भविष्यात भांडेवाडी येथे बायो सीएनजी तयार करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. लवकरच या प्रकल्पाचे काम सुरू होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.दिव्यांगांना मोफत प्रवासदिव्यांगांना शहर बस्मधूत मोफत प्रवास करता येणार आहे. २ मार्च २०१९ पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. दिव्यांगासोबत असणाऱ्या एका व्यक्तीला मोफत प्रवास करता येणार आहे. मात्र यासाठी दिव्यांगांना समाजकल्याण विभागाकडून देण्यात आलेले कार्ड वाहकांना दाखवावे लागतील.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाpassengerप्रवासी