शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
7
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
8
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
9
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
10
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
11
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
12
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
13
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
14
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
15
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
17
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
18
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
19
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
20
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा

स्वच्छ सर्वेक्षणात नागपूर घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 10:59 PM

केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने देशव्यापी स्वच्छ सर्वेक्षण करण्यात येत आहे. १ ते ३१ आॅगस्टपर्यंत हा सर्वेक्षणाचा कालावधी असून, २९ आॅगस्टपर्यंत नागपूर जिल्ह्यातून केवळ ७८०० नागरिकांनीच स्वच्छ सर्वेक्षणात आपले मत नोंदविले आहे. तुलनेत विदर्भातून चंद्रपूर जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षणाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

ठळक मुद्देकेवळ ७८०० नागरिकांनीच नोंदविले मत : विदर्भात चंद्रपूर प्रथम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने देशव्यापी स्वच्छ सर्वेक्षण करण्यात येत आहे. १ ते ३१ आॅगस्टपर्यंत हा सर्वेक्षणाचा कालावधी असून, २९ आॅगस्टपर्यंत नागपूर जिल्ह्यातून केवळ ७८०० नागरिकांनीच स्वच्छ सर्वेक्षणात आपले मत नोंदविले आहे. तुलनेत विदर्भातून चंद्रपूर जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षणाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.जिल्ह्यातील प्रत्येक गावात हे सर्वेक्षण होत आहे. सर्वेक्षणातून गावातील स्वच्छता, स्वच्छतेशी निगडित कामाची गुणवत्ता लक्षात घेऊन त्यावर रँकिंग देण्यात येणार आहे. अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आठवडी बाजाराची ठिकाणे, धार्मिक स्थळे, सार्वजनिक व संस्थात्मक ठिकाण आदीचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तसेच स्वच्छतेविषयी ग्रामस्थ, ग्रा.पं. चे पदाधिकारी यांच्यात असलेली तळमळ, त्यांचे मत नोंदविण्यात आले आहे. त्याचबरोबर या सर्वेक्षणासाठी केंद्र सरकारने ‘एसएसजी-१८’ हे अ‍ॅप तयार केले आहे. नागरिकांनी आपल्या मोबाईलवर हे अ‍ॅप डाऊनलोड करून, स्वच्छतेबाबत आपले अभिप्राय त्यात द्यायचे आहे. यामध्ये ४ प्रश्न विचारण्यात आले आहे. त्याच उत्तर नागरिकांना द्यायचे आहे. या निकषाच्या आधारे प्रत्येक जिल्ह्यांचे आणि राज्यातील स्वच्छतेचे स्थान आणि क्रमवारी निश्चित होणार आहे. सर्वेक्षणात सर्वोच्च स्थान प्राप्त करणारे जिल्हे आणि राज्य यांना २ आॅक्टोबर रोजी पुरस्कृत करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे अख्खे प्रशासन कामी लागले होते. शाळा, ग्रा.पं. मध्ये त्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या. असे असतानाही नागपूर जिल्ह्यातील सर्वेक्षणाला अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही.विदर्भात नागरिकांनी जिल्हानिहाय नोंदलेली मतं (२९ आॅगस्टपर्यंत)चंद्रपूर - ३९१००बुलडाणा - ३०५१७गोंदिया - १९७४०अमरावती - १३८०८वर्धा - ११९६९नागपूर - ७७९३भंडारा - ७४८९गडचिरोली - ४१४५यवतमाळ - ३२८५अकोला - ३०८८वाशिम - २८७६

टॅग्स :nagpurनागपूर