शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

पाणी खासगीकरणाविरुद्ध नागरिक रस्त्यावर

By admin | Updated: January 11, 2015 00:49 IST

नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात पाण्याचे खासगीकरण करण्यात आल्याच्या विरोधात नागपूर म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनच्या नेतृत्वात शनिवारी पंचशील चौक वर्धा रोड येथे नागरिकांनी निदर्शने केली.

पंचशील चौकात निदर्शने : २४ बाय ७ योजना रद्द करण्याची मागणी नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात पाण्याचे खासगीकरण करण्यात आल्याच्या विरोधात नागपूर म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनच्या नेतृत्वात शनिवारी पंचशील चौक वर्धा रोड येथे नागरिकांनी निदर्शने केली. निदर्शनांचे नेतृत्व करणारे युनियनचे अध्यक्ष जम्मू आनंद यांनी सांगितले की, शहरात पाण्याचे खासगीकरण होऊन सहा वर्षे झाली आहेत. या सहा वर्षात ना नागरिकांना लाभ मिळाला ना महापालिकेला लाभ झाला. उलट महापालिकेवरील संकट वाढत गेले. पाणीपुरवठा व्यवस्था जेव्हा महापालिकेच्या हातात होती, तेव्हा त्याच्या सुधारणेसाठी एक रुपयाही खर्च करण्यात आला नाही. परंतु खासगीकरण होताच कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले जात आहे. हे सर्व कुणासाठी होत आहे. खासगीकरणापूर्वी प्रति युनिट ३.२० रुपये पाणी मिळत होते. आता त्याचेच ६.५० रुपये वसूल केले जात आहे. परवानाधारक प्लंबरचा रोजगार हिसकावण्यात आला आहे. पूर्ण काम कंत्राटी तत्त्वावर केले जात आहे. नागरिकांना केवळ दिवसात २ ते ३ तास पूर्ण दाबाने पाणी मिळाले तरी त्यांची गरज पूर्ण होते. परंतु तरीही २४ तास पाणी उपलब्ध करून देण्याची सक्ती का केली जात आहे. एकूणच हा सर्व प्रकार खासगी कंपनीला लाभ पोहोचवण्यासाठी सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी नागरिकांनी नारेबाजी करीत पाण्याचे खासगीकरण बंद करा, २४ बाय ७ पाणी करार रद्द करण्यात यावा आणि पाण्याची व्यवस्था महापालिकेने आपल्या हातात घ्यावी, अशी मागणी लावून धरली. आंदोलनात शंकर मौर्य, अनिल हजारे, रमेश गवई, खुशाल चवरे, प्रकाश मेश्राम, प्रदीप हजारे, केशव कथले, दीप फुले, देवेंद्र जैन, सुमीत महतो, शुभम कांबळे, किरण ठाकरे, शांता बारसागडे, अनिता मेश्राम, वर्षा गोडघाटे, रुबीना पटेल, शोभा तोडासे, सुषमा वैद्य, उत्तम बाबा सेनापती, मनोज श्रीवास्तव यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक सहभागी होते. (प्रतिनिधी)