चिनी मिरची व्यापाऱ्याचा उमरेडच्या हॉटेलात मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 15:59 IST2020-03-24T15:59:13+5:302020-03-24T15:59:33+5:30
चीनमधील एक मिरची व्यापारी उमरेडला मुक्कामी असल्याची बाब काल सोमवारी रात्री उघडकिस आली.

चिनी मिरची व्यापाऱ्याचा उमरेडच्या हॉटेलात मुक्काम
ठळक मुद्देपालिकेचे आरोग्य विभाग झाले सतर्क
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: चीनमधील एक मिरची व्यापारी उमरेडला मुक्कामी असल्याची बाब काल सोमवारी रात्री उघडकिस आली. हुआंग हॅन (४१) असे या व्यापाऱ्याचे नाव असून तो मागील काही दिवसांपासून उमरेडच्या डी मर्सी हॉटेलमध्ये मुक्कामी होता. उमरेड पालिकेच्या अंतर्गत असलेली आरोग्य विभाग यंत्रणा या बातमीने खडबडून जागी झाली. अखेरीस मंगळवारी दुपारी 3 वाजता या पाहुण्याला नागपूर मेयो रुग्णालयात रवाना करण्यात आले.