शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांमध्ये ‘चाईल्ड सीट्स’ अत्यावश्यक

By admin | Updated: January 28, 2017 01:43 IST

वाहनांमधील आसन (सीट) हे प्रौढ प्रवाशांच्या आकाराचे असते. सुरक्षेच्या उपाययोजनाही त्यांच्याच सोर्इंच्या असतात. लहान मुलांच्या सुरक्षेसाठी वेगळी व्यवस्था राहत नाही.

अ‍ॅण्ड्रयू हॉवर्ड यांचे आवाहन : ‘पॅसिकॉन-२०१७’ राष्ट्रीय बालअस्थिव्यंग परिषदनागपूर : वाहनांमधील आसन (सीट) हे प्रौढ प्रवाशांच्या आकाराचे असते. सुरक्षेच्या उपाययोजनाही त्यांच्याच सोर्इंच्या असतात. लहान मुलांच्या सुरक्षेसाठी वेगळी व्यवस्था राहत नाही. परिणामी, अपघात झाल्यास मोठ्यांच्या तुलनेत लहान मुले लवकर गंभीर जखमी होतात. यांच्यामध्ये मृत्यूचे प्रमाणही मोठे असते. म्हणूनच प्रत्येक वाहनांमध्ये लहान मुलांचे आसन व त्यांच्या सुरक्षेची विशेष व्यवस्था असणे आवश्यक आहे. किंबहुना सर्व देशांनी वाहनांमध्ये ‘चाईल्ड सीट्स’ अत्यावश्यक कराव्यात, असे आवाहन, टोरण्टो कॅनडा येथील प्रसिद्ध अस्थिरोग विशेषज्ञ डॉ. अ‍ॅण्ड्रयू हॉवर्ड यांनी येथे केले.विदर्भ आॅर्थाेपेडिक असोसिएशनतर्फे पेडियाट्रिक आॅर्थाेपेडिक सोसायटी आॅफ इंडियाच्या २३ व्या ‘पॅसिकॉन-२०१७’ या राष्ट्रीय बालअस्थिव्यंग परिषदेत ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. परिषदेचे उद्घाटन संस्थेचे आश्रयदाते डॉ. सुधीर बाभुळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी परिषदेचे आयोजक अध्यक्ष डॉ. आर.एम. चांडक, डॉ. सुधीर सोनी व डॉ. अशोक लवंगे, आयोजक सचिव डॉ. विराज शिंगाडे, विदर्भ आर्थाेपेडिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र चौधरी, सचिव डॉ. अलंकार रामटेके, पेडियाट्रिक आर्थाेपेडिक सोसायटीच्या अध्यक्ष डॉ. वृषा माधुरी, सचिव डॉ. अलारिक आरुजीस आदी उपस्थित होते. डॉ. हॉवर्ड म्हणाले, मागील काही वर्षांत रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण सर्वच देशांत वाढले आहे. या अपघातात लहान मुलांच्या बळीची संख्या मोठी आहे. यावर उपाययोजना करणे आवश्यक असून त्यांच्यासाठी वेगळ्या सुरक्षेच्या उपाययोजनांची गरज असल्याचेही ते म्हणाले.(प्रतिनिधी) मुलांच्या अस्थिव्यंगाचे लवकर निदान आवश्यक -डॉ. पिरानीकॅनडा येथील प्रसिद्ध अस्थिरोग विशेषज्ञ डॉ. शफिक पिरानी म्हणाले, लहान मुलांच्या अस्थिव्यंगाचे लवकर निदान होणे आवश्यक आहे. कमी वयात पावलांचे व्यंग दूर होऊन जर आधार मिळाला नाही तर ते परावलंबी होतात. दैनंदिन जीवनात काम करताना किंवा वावरताना खूप अडथळे निर्माण होतात, त्यांच्या शारिरीक व मानसिक अवस्थेवर अनेक विपरीत परिणाम होतात व ते निराशमय जीवन जगतात. समाजातदेखील त्यांची सतत अवहेलना होते. म्हणूनच युगांडामध्ये यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येतात, तोच भारतातही सुरू होणे आवश्यक आहे. असे झाल्यास मुलांचे अपंगत्व दूर करणे शक्य होईल.मुलासारखे रुग्णावर उपचार करा : डॉ.झव्हेरीरुग्णावर उपचार करताना तो आपल्या मुलासारखा आहे या भावनेतून उपचार करा, असा सल्ला डॉ. अशोक झव्हेरी यांनी दिला. त्यांनी यावेळी काही उदाहरणेही दिली. ते म्हणाले, यामुळे रुग्ण व डॉक्टरांमध्ये निर्माण होणारे तडे काही प्रमाणात कमी होतील. दुसऱ्या दिवशीच्या सत्रात विविध शोधनिबंधाचे वाचन करण्यात आले. या शिवाय, मी कसे निदान करतो, सतर्कता, माझा वाईट अनुभव आदी विषयांवर तज्ज्ञाची आपले विचार मांडले.