ट्रॅक्टरखाली दबून मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:09 IST2021-05-07T04:09:09+5:302021-05-07T04:09:09+5:30

पारशिवनी : ट्रॅक्टरवर बसलेला मुलगा अचानक खाली पडला व ट्रॅक्टरखाली दबून त्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना पारशिवनी पाेलीस ...

Child dies after being crushed under a tractor | ट्रॅक्टरखाली दबून मुलाचा मृत्यू

ट्रॅक्टरखाली दबून मुलाचा मृत्यू

पारशिवनी : ट्रॅक्टरवर बसलेला मुलगा अचानक खाली पडला व ट्रॅक्टरखाली दबून त्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना पारशिवनी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गवना गावात गुरुवारी (दि.६) दुपारी घडली.

दुर्गेश पारधी (७, रा. वीटभट्टा, वाघाेडा, ता. पारशिवनी) असे मृत मुलाचे नाव आहे. गवना गावातील रस्त्यावर ट्रॅक्टर टँकरद्वारे पाणी मारण्याचे काम सुरू आहे. दुर्गेश हा एमएच-४०/एल-३००९ क्रमांकाच्या ट्रॅक्टरवर बसला हाेता. या ट्रॅक्टरला पाण्याचे टँकर जाेडले हाेते. दरम्यान, रस्त्यावर पाणी मारणे सुरू असताना, ट्रॅक्टरचालक अरुण श्रीपत शिंदेमेश्राम याने ट्रॅक्टर जाेरात पळविला. त्यामुळे दुर्गेश ट्रॅक्टरवरून खाली पडला व चाकाखाली दबून गंभीररीत्या जखमी झाला. ग्रामस्थांनी घटनेची माहिती दुर्गेशचे वडील धनुसकुमार पारधी यांना दिली. त्यांनी घटनास्थळ गाठून ग्रामस्थांच्या मदतीने मुलाला पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे तपासणीअंती डाॅक्टरांनी त्याला मृत घाेषित केले. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी घटनेची नाेंद केली असून, तपास सुरू केला आहे.

Web Title: Child dies after being crushed under a tractor