मोबाइलवर गेम खेळताना आईने हटकल्याने मुलाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 05:44 IST2020-07-09T05:43:51+5:302020-07-09T05:44:18+5:30

शाळा बंद असल्याने प्रिन्स सतत मोबाईलवर गेम खेळत राहायचा. त्यामुळे आई रागवत असे.

Child commits suicide after mother asked while playing games on mobile | मोबाइलवर गेम खेळताना आईने हटकल्याने मुलाची आत्महत्या

मोबाइलवर गेम खेळताना आईने हटकल्याने मुलाची आत्महत्या

नागपूर : मोबाईलवर गेम खेळताना आईने हटकल्याने मुलाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना नगरधन येथे बुधवारी सकाळी घडली. प्रिन्स रवींद्र खानकुळे (१३, रा. नगरधन, ता. रामटेक) असे मृताचे नाव असून, तो स्व. इंदिरा गांधी शाळेचा नववीचा विद्यार्थी होता.
शाळा बंद असल्याने प्रिन्स सतत मोबाईलवर गेम खेळत राहायचा. त्यामुळे आई रागवत असे. वडील शेतात गेल्यानंतर तो मोबाईलवर गेम खेळू लागला. आईने त्याच्या हातून मोबाईल हिसकावून घेत त्याला हटकले. त्यानंतर तो रागावून निघून गेला. आईला वाटले तो नेहमीप्रमाणे काकाकडे गेला असेल. त्यानंतर कपडे सुकविण्यासाठी गच्चीवर गेल्यावर प्रिन्सने पाईपला दोरीच्या साहाय्याने गळफास लावल्याचे आढळून आले.

Web Title: Child commits suicide after mother asked while playing games on mobile