Chief Minister's warm welcome by Mahavikas Aghadi today | मुख्यमंत्र्यांचे महाविकासआघाडीतर्फे आज जंगी स्वागत

मुख्यमंत्र्यांचे महाविकासआघाडीतर्फे आज जंगी स्वागत

ठळक मुद्देसोमवारी शिवसैनिकांचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी प्रथमच नागपुरात येत असल्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाविकास आघाडीतर्फे रविवारी विमानतळासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ दुपारी १ वाजता जंगी सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार कृपाल तुमाने यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी आमदार आशिष जयस्वाल, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष सतीश हरडे, सतीश इटकेलवार, किरण पांडव, किशोर कन्हेरे, किशोर कुमेरिया, सुधीर सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
स्वागत समारंभाला महाविकास आघाडीचे नेते, आमदार, खासदार व पदाधिकारी उपस्थित राहतील. ठाकरे यांच्या परिवारातील व्यक्ती प्रथमच मुख्यमंत्री झाल्याने विदर्भातील शिवसैनिकांना त्यांना भेटण्याची उत्सुकता असल्याने स्वागत समारंभाला मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील.
सोमवारी सायंकाळी ६ वाजता सुरेश भट सभागृहात शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करतील. यावेळी खासदार संजय राऊ त यांच्यासह पक्षाचे खासदार, आमदार व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती कृपाल तुमाने यांनी दिली.

Web Title: Chief Minister's warm welcome by Mahavikas Aghadi today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.