मुख्यमंत्री शिंदे यांची १२ नोव्हेंबर रोजी भंडाऱ्यात जाहीर सभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 20:28 IST2022-11-09T20:28:12+5:302022-11-09T20:28:38+5:30

पूर्व विदर्भातील ही पहिलीच जाहीर सभा असणार आहे

Chief Minister Shinde's public meeting at Bhandara on November 12 | मुख्यमंत्री शिंदे यांची १२ नोव्हेंबर रोजी भंडाऱ्यात जाहीर सभा

मुख्यमंत्री शिंदे यांची १२ नोव्हेंबर रोजी भंडाऱ्यात जाहीर सभा

नागपूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १२ नोव्हेंबर रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, दुपारी २.३० वाजता ते माधवनगरातील खात रोड रेल्वे मैदानावर जाहीर सभा घेणार आहेत. सत्ता स्थापनेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांची पूर्व विदर्भातील ही पहिलीच जाहीर सभा असणार आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांचे दुपारी १२ वाजता शासकीय विमानाने नागपूर विमानतळावर आगमन होईल. तेथून हेलिकॉप्टरने ते गोसीखुर्द धरण हेलिपॅडवर पोहोचतील. दुपारी १२.२५ वाजता ते गोसेखुर्द जलपर्यटन व प्रकल्पाची पाहणी करतील. यानंतर भंडारा येथे खांब तलाव सौंदर्यीकरणाचे उद्घाटन तसेच भुयारी गटार योजनेतील कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल. सायंकाळी ४.५० वाजता ते नागपूरहून विमानाने मुंबईला रवाना होतील.

Web Title: Chief Minister Shinde's public meeting at Bhandara on November 12