शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
3
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
6
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
7
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
8
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
9
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
10
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
11
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
12
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
13
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
15
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
16
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
17
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
18
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
19
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
20
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

गुंडांशी लढणाऱ्या आम आदमीला मुख्यमंत्र्यांनी दिला अंगरक्षक

By admin | Updated: July 1, 2014 00:58 IST

पुलगाव पालिकेच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कडवा विरोध करणाऱ्या एका पानटपरीचालकास थेट मुख्यमंत्र्यांनी पोलीस संरक्षण दिले आहे. पानटपरीचालकास मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने

पुलगाव ऩप़ जागेवर अवैध बांधकाम प्रकरण : आरोपींना पोलीस व न.प. प्रशासनाकडून अभयराजेश भोजेकर - वर्धापुलगाव पालिकेच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कडवा विरोध करणाऱ्या एका पानटपरीचालकास थेट मुख्यमंत्र्यांनी पोलीस संरक्षण दिले आहे. पानटपरीचालकास मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने अंगरक्षक मिळाल्याची महाराष्ट्रातील ही कदाचित पहिलीच घटना असावी़ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या या कारवाईने अन्यायाच्या विरोधात लढणाऱ्यांना बळ मिळणार असल्याची भावना पानटपरीचालक दुर्गाशंकर शितलसहाय वाजपेयी याने व्यक्त केली़पुलगावला वॉर्ड क्ऱ ४ बरांडा येथे राहणारा दुर्गाशंकर अनेक वर्षांपासून सीएडी कॅम्प रोड मार्गावरील डायमंड लॉजपुढे पानठेला चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता़ पानठेला असलेल्या परिसरातील ऩप़च्या जागेवर जुगलकिशोर शुक्ला यांनी अवैधरीत्या हॉटेल बांधकाम केले़ त्याची तक्रार त्याने पोलिसात केली़ त्यामुळे दुर्गाशंकरला मारहाण झाली़ शिवीगाळही झाली़ जुगलकिशोर यांनी एक-दीड वर्षांी ते हॉटेल भागवतीप्रसाद तिवारी यांना जागेसह विकले़ त्यानंतर तिवारी यांनी दुर्गाशंकरच्या मागे पानठेला हटविण्यासाठी तगादा लावला़ त्याला धमक्या देणे सुरू झाले. दरम्यान, दुर्गाशंकरला तब्बल १३ वेळा मारहाण करण्यात आली. प्रत्येक वेळी त्याने पुलगाव पोलिसांना रितसर तक्रार दिली़ मात्र एकदाही कारवाई झाली नाही़ लोकशाही दिनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली़ नंतर विभागीय आयुक्तांकडेही तक्रार केली़ उपयोग न झाल्याने अखेर थेट मुंबई गाठून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेत आपबिती सांगितली़ मुख्यमंत्र्यांनी त्याची तक्रार गांभीर्याने घेतली़ इतकेच नव्हे, तर सचिवामार्फत पोलीस महासंचालकांना आदेश देत दुर्गाशंकर यांना पोलीस संरक्षण द्यावे व याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून संबंधितांवर कारवाईचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या़ तरीही कोणतीच कारवाई झाली नाही. ही बाब त्याने पुन्हा मुख्यमंत्र्यांना कळविल्यानंतर त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी अंगरक्षक दिला़संबंधितांवर मात्र अद्यापही कारवाई झालेली नाही़ या प्रकरणात पोलीस प्रशासनासह नगर पालिकेची यंत्रणाही गुंतली असल्यामुळे कारवाईस धजावत नसल्याचा आरोप पीडित दुर्गाशंकर वाजपेयी यांनी केला आहे.