शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

जनतेत जाऊन जाब विचारणार, छगन भुजबळांचा फडणवीस सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2018 8:31 PM

मुख्यमंत्री स्वत:चीच वकिली करताहेत

नागपूर : सिडकोच्या भूखंड घोटाळ्यावरून मुख्यमंत्र्यांवर अनेक प्रश्न उपस्थित झाले. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे म्हणणे खोडून काढण्यासाठी शक्ती लावली पण खरे उत्तर दिले नाही. मुख्यमंत्र्यांना एकीकडे मंत्र्यांना सांभाळायचे आहे. नगर विकास खातेही जपायचे आहे. विरोधकांनाही तोंड द्यायचे आहे. आरोपांमध्ये तथ्य नाही याची वकिली देखील त्यांनाच करायची आहे. मुख्यमंत्री अशा बहुविध भूमिका समर्थपणे वठवित आहेत, असा चिमटा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी घेतला. 

सिडको प्रकरणात काहीही चुकीचे झाले नाही तर स्थगिती का दिली, असा प्रश्न उपस्थित करीत एकप्रकारे मुख्यमंत्र्यांनी आरोपांना सहमतीच दिली असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी, कामगार, व्यापारी, ओबीसी, विद्यार्थी सर्वांचेच प्रश्न कायम आहेत. त्यावर सरकारने उत्तर द्यावे.  विरोधी पक्षाचे सदस्य अधिवेशनात महत्त्वाचे प्रश्न मांडत आहेत. मात्र, सरकारकडून खरे उत्तर मिळत नाही किंवा त्याला बगल दिली जातेय. विरोधकांना सभागृहात बोलायलाही मर्यादा आणल्या जात आहेत. आपण जनतेच्या प्रश्नांवर विधानसभेत तर बोलणारच आहोत पण जनतेत जाऊनही सरकारला जाब विचारणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला.    विधानभवनात जलयुक्त आवार  मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार ही योजना ग्रामीण भागासाठी घेतली होती. मात्र, ती नागपूरसारख्या शहरी भागातही यशस्वीरीत्या राबविण्यात आल्याचे दिसले. जलयुक्तचा प्रयोग विधान भवनातही यशस्वी होताना दिसला. विधानभवनात जलयुक्त आवारसाठी विधानसभा अध्यक्षांनी परवानगी दिली होती का, असा खोचक प्रश्नही त्यांनी केला. 

 

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस