शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खतावर अमृतपाण्याचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 01:53 IST

कमी मेहनतीत भरघोस उत्पन्न घेण्याच्या मोहात शेतकरी भरमसाठ रासायनिक खताचा वापर करून शेतजमीन प्रदूषित करतो आहे.

बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांचे संशोधन : जमिनीबरोबर पिकांचीही गुणवत्ता सुधारली लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कमी मेहनतीत भरघोस उत्पन्न घेण्याच्या मोहात शेतकरी भरमसाठ रासायनिक खताचा वापर करून शेतजमीन प्रदूषित करतो आहे. हे संशोधनासह बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध केले आहे. या विद्यार्थ्यांनी रासायनिक खत व पारंपरिक अमृतपाणी या दोन्हीच्या माध्यमातून शेती केली. सात महिन्याच्या प्रयोगाअंती आलेल्या निष्कर्षातून रासायनिक खतांच्या तुलनेत अमृतपाण्याची गुणवत्ता कितीतरी पटीने सरस ठरली. निव्वळ पीकच नाही, तर जमिनीची गुणवत्ता देखील सुधारली. बायोटेक्नॉलॉजीच्या अंतिम वर्षाला शिकणारे राहुल सातपुते व आदित्य शिंगोटे या विद्यार्थ्यांनी ‘बायोवेस्ट टू बायोफर्टिलायझर’ या विषयावर संशोधन केले. यासाठी त्यांना नीरी व गोविज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार यांचे सहकार्य मिळाले. देवलापारला या विद्यार्थ्यांनी एक एकर शेतीत गहू पेरला. त्यात त्यांनी २४ प्लॉट पाडले. यात १८ प्लॉटमध्ये अमृतपाणी दिले. ३ प्लॉटमध्ये कुठलीच ट्रीटमेंट दिली नाही. तर ३ प्लॉटमध्ये रासायनिक खतांचा वापर केला. गव्हाची पेरणी करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी मृदा परीक्षण केले. दर महिन्याला ते अमृतपाण्याच्या प्लॉटमधील पिकांना अमृतपाणी द्यायचे. तर रासायनिक खतांच्या प्लॉटमध्ये रासायनिक खत द्यायचे. पेरणी केल्यानंतर ते पीक हातात येईपर्यंत लागलेल्या सात महिन्यांच्या कार्यकाळात सुद्धा मातीचे परीक्षण केले. नीरीमध्ये त्यांनी सीएचएनएस अ‍ॅनालायझर, जेलदाल अ‍ॅप्रेटस, फ्लेज फोटोमिटर आणि आसीपी-ओईएस या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जमिनीतील उपलब्ध नायट्रोजन, फास्फोरस, पोटॅशियम आणि मेटल्सचे निरीक्षण केले. यात निरीक्षणात रासायनिक खतांच्या तुलनेत अमृतपाण्यामुळे जमिनीची गुणवत्ता वाढत गेली. सात महिन्यानंतर पीक हातात आल्यानंतर पिकांचे सुद्धा निरीक्षण केले. विशेष म्हणजे अमृतपाणी दिलेल्या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव आढळला नाही. बायोवेस्ट कमी आले. दाण्याचे न्युट्रीशन मूल्य व वजनसुद्धा वाढले.