शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

बँकेत नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 11:49 PM

आधी लिपिक आणि नंतर उपव्यवस्थापक म्हणून नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एका आरोपीने तरुणीचे एक लाख रुपये हडपले. विशेष म्हणजे, तिच्या माध्यमातून दुसऱ्याचीही त्याने फसवणूक केली. मात्र फसगत झालेल्या तरुणीवरच अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्दे एक लाख हडपले : बनावट नियुक्तीपत्र दिले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आधी लिपिक आणि नंतर उपव्यवस्थापक म्हणून नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एका आरोपीने तरुणीचे एक लाख रुपये हडपले. विशेष म्हणजे, तिच्या माध्यमातून दुसऱ्याचीही त्याने फसवणूक केली. मात्र फसगत झालेल्या तरुणीवरच अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.अश्विनी गुलाबराव ठवळे (वय २४) असे पीडित तरुणीचे नाव आहे. ती वर्धा जिल्ह्यातील काजळी (ता. कारंजा घाडगे) येथील रहिवासी आहे.आज तिने पोलीस आयुक्त कार्यालयात दिलेल्या तक्रारीनुसार, वर्धा येथील सहयोग नगरातील रहिवासी असलेल्या आरोपी पंकज जयस्वाल याने तुला माझ्या बँकेत ३५ हजार रु. महिन्याची नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवले. त्या बदल्यात आरोपी जयस्वालने अश्विनीकडून एक लाख रुपये घेतले. नंतर त्या जागा भरल्या आता पुन्हा उपव्यवस्थापक पदासाठी जागा निघाल्या, असे सांगून २० मार्च २०१८ ला तिला एक लाख पंचवीस हजार रुपये पगाराचे नियुक्तीपत्र दिले. बँकेत गेल्यानंतर ते नियुक्तीपत्र बनावट असल्याचे उघड झाले. त्यामुळे अश्विनीने ७ मार्च २०१९ ला कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानंतर कारंजा (जि. वर्धा) पोलीस ठाण्यातही तक्रार नोंदविली. मात्र त्यावर कारवाई झाली नाही. दरम्यान आरोपीने अश्विनीच्या माध्यमातून प्रतिभा नामक तरुणीकडूनही नोकरीच्या नावाखाली रक्कम घेतली. दोन वर्ष होऊनही नोकरी न मिळाल्याने प्रतिभाने अश्विनीविरुद्ध अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी अश्विनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आपली रक्कम गेली आणि फसवणूक झाली. शिवाय आपल्याचविरुद्ध फसवणुकीचा गुन्हाही दाखल झाल्यामुळे अश्विनी हादरली आहे.पोलीस आयुक्तालयात धावगुन्हा दाखल झाल्यापासून आपल्या जवळचे कागदपत्र घेऊन अश्विनीन्यायासाठी इकडे तिकडे फिरत आहे. तिने संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन आपली बाजूही मांडली आहे. दाद मिळत नसल्याचे पाहून तिने आज पोलीस आयुक्तांकडे तक्रार नोंदवून न्यायाची अपेक्षा व्यक्त केली.

टॅग्स :fraudधोकेबाजीjobनोकरीbankबँक