शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

नागपुरात भूखंड विक्रीची बनवाबनवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 10:32 PM

हुडकेश्वरमधील सख्ख्या भावाने त्याच्या भावाच्या भूखंडाची दुसऱ्या आरोपींना विक्री करून दिली तर, गिट्टीखदानमध्ये दोन आरोपींनी अस्तित्वात नसलेल्या भूखंडाची बनावट कागदपत्रे तयार करून एका व्यक्तीला तो विकला आणि त्यांच्याकडून १५ लाख रुपये घेतले.

ठळक मुद्देहुडकेश्वरमध्ये सख्ख्या भावाने केली फसवणूक : गिट्टीखदानमध्ये अस्तित्वात नसलेल्या भूखंडाची विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हुडकेश्वरमधील सख्ख्या भावाने त्याच्या भावाच्या भूखंडाची दुसऱ्या आरोपींना विक्री करून दिली तर, गिट्टीखदानमध्ये दोन आरोपींनी अस्तित्वात नसलेल्या भूखंडाची बनावट कागदपत्रे तयार करून एका व्यक्तीला तो विकला आणि त्यांच्याकडून १५ लाख रुपये घेतले. या दोन्ही प्रकरणात अनुक्रमे हुडकेश्वर आणि गिट्टीखदान पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.हुडकेश्वरकृष्णा सीतारामजी काळबांडे (वय ७२, रा. रुक्मिणीनगर) आणि भास्कर सीतारामजी काळबांडे (रा. क्रीडा चौक, हुनमाननगर) या दोन भावांची बी. एस. काळबांडे नावाची फर्म होती. या दोघांच्या वडिलांची जी मालमत्ता होती, तिची सीतारामजी काळबांडे यांनी स्वत:च्या हयातीत हिस्सेवाटणी करून दिली होती. कृष्णा आणि भास्कर हे दोघे भाऊ १९९३ पासून वेगवेगळे राहू लागले.बी. एस. फर्मवर असलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी भास्कर काळबांडेने मौजा नरसाळा येथील ३ हजार चौरस फूट जमीन १४ जून २००६ ला कृष्णा काळबांडे यांच्या नावाने करून दिली. त्यानंतर काही दिवसांनी या भूखंडाचे कागदपत्र हरविल्याचे खोटे शपथपत्र तयार करून सह निबंधक कार्यालयातून भूखंडाची प्रमाणित प्रत काढली आणि हा भूखंड भास्करने उदयभान काशीरामजी वासनिक (रा. सर्वोदय ले आऊट, चांदमारी मंदिर रोड, नागपूर) याला आणि वासनिक याने राकेश नारायण गोसेकर (रा. आदमशहा ले आऊट, गणेश नगर, नागपूर) याला विकला. काही दिवसांपूर्वी कृष्णा काळबांडे आपल्या भूखंडावर गेले असता त्यांना तेथे राकेश गोसेकरच्या नावाचा फलक दिसला. आपल्या भूखंडावर गोसेकरचा फलक कुणी लावला, अशी विचारणा कृष्णा यांनी भास्करला केली असता त्याने खरी माहिती सांगण्याऐवजी तुझ्याने जे होते, ते करून घे, असे म्हटले. सख्ख्या भावाने फसवणूक केल्यामुळे कृष्णा काळबांडे यांनी हुडकेश्वर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींची चौकशी सुरू आहे.गिट्टीखदानआरोपी विजय हटकरे (वय ५०, रा. कामठी) आणि ईस्माईल अन्सारी (रा. गव्हर्नमेंट प्रेस कॉलनी दाभा) या दोघांनी जुना फुटाळा येथील भीमसेन मंदिराजवळ राहणारे यादव धोंडीराम वानखेडे (वय ६६) यांना मौजा दाभा येथील आशादीप गृहनिर्माण सहकारी सोसायटीत १५०० चौरस फूटाचा भूखंड दाखवला.तो १५ लाखांत विकण्याचा सौदा करून वानखेडे यांच्याकडून दोन्ही आरोपींनी १६ जून २०१६ रोजी १५ लाख रुपये घेतले.बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याची वानखेडेला विक्रीही करून दिली. प्रत्यक्षात वानखेडे जेव्हा भूखंडाचा ताबा घेण्यासाठी गेले तेथे नमूद वर्णनाचा भूखंडच अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले. आरोपींनी फसवणूक केल्याचे उघड झाल्यानंतर वानखेडे यांनी गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी हटकरे आणि अंसारीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यांची चौकशी केली जात आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी