धक्कादायक! मामीकडून सोळावर्षीय भाच्याचे लैंगिक शोषण; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2022 14:59 IST2022-02-22T14:40:00+5:302022-02-22T14:59:03+5:30
२१ वर्षीय मामीने आपल्या १६ वर्षीय भाच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

धक्कादायक! मामीकडून सोळावर्षीय भाच्याचे लैंगिक शोषण; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
नागपूर : मामीने अल्पवयीन भाच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पारशिवनी येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित भाच्याच्या तक्रारीवरून मामीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार, आरोपी मामीचे वय २१ वर्ष आहे. तर, पीडीत मुलगा १६ वर्षांचा असून तो दहावीत शिकतो. २०२० मध्ये पीडित मुलगा काही कामानिमित्त मामाकडे गेला होता. यावेळी, मामीने घरात कोणी नसताना या मुलावर लैंगिक अत्याचार केला व त्याचे चित्रीकरणही केले. त्यानंतर, सदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिने अनेकदा पीडित मुलाचे लैंगिक शोषण केले.
मामीचा त्रास असह्य झाल्याने मुलाने आपल्या पालकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर, मुलासह नातेवाईकांनी पारशिवनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणी पारशिवनी पोलिसांनी महिलेविरद्ध ठार मारण्याची धमकी व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. अद्याप आरोपी महिलेला अटक करण्यात आलेली नाही.