नऊ सुपरफास्ट रेल्वेगाड्यांच्या वेळेत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 08:29 PM2020-11-28T20:29:27+5:302020-11-28T20:29:52+5:30

Indian Railways Nagpur News मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून धावणाऱ्या नऊ सुपरफास्ट विशेष रेल्वेगाड्यांच्या वेळेत बदल केला आहे. त्यामुळे या रेल्वेगाड्या आता बदललेल्या वेळापत्रकानुसार धावणार आहेत.

Changes in the timing of nine superfast trains | नऊ सुपरफास्ट रेल्वेगाड्यांच्या वेळेत बदल

नऊ सुपरफास्ट रेल्वेगाड्यांच्या वेळेत बदल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून धावणाऱ्या नऊ सुपरफास्ट विशेष रेल्वेगाड्यांच्या वेळेत बदल केला आहे. त्यामुळे या रेल्वेगाड्या आता बदललेल्या वेळापत्रकानुसार धावणार आहेत.

रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, रेल्वेगाडी क्रमांक ०२८०५ विशाखापट्टणम-नवी दिल्ली विशेष रेल्वेगाडी १ डिसेंबर २०२० पासून विशाखापट्टणम येथून रात्री १० वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी बल्लारशाहला सकाळी ११.१५, चंद्रपूरला ११.३८, नागपूरला दुपारी २.१५ वाजता आणि तिसऱ्या दिवशी नवी दिल्लीला पहाटे ५.४० वाजता पोहोचेल.

रेल्वेगाडी क्रमांक ०२८०६ नवी दिल्ली-विशाखापट्टणम विशेष रेल्वेगाडी १ डिसेंबरपासून नवी दिल्लीवरून रात्री ८ वाजता सुटेल. ही गाडी नागपूरला दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३५ वाजता, चंद्रपूरला दुपारी १ वाजता, बल्लारशाहला २.०५ वाजता आणि विशाखापट्टणमला तिसऱ्या दिवशी पहाटे ४.१० वाजता पोहोचेल.

रेल्वेगाडी क्रमांक ०८४०५ पुरी-अहमदाबाद विशेष रेल्वेगाडी २ डिसेंबरपासून पुरीवरून सायंकाळी ७.२० वाजता सुटेल. ही गाडी नागपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी २.४५ वाजता, वर्धा ३.५५, बडनेरा सायंकाळी ५.४२, अकोला ६.४० आणि अहमदाबादला तिसऱ्या दिवशी सकाळी ६.२५ वाजता पोहोचेल.

रेल्वेगाडी क्रमांक ०८४०६ अहमदाबाद-पुरी विशेष रेल्वेगाडी ४ डिसेंबरपासून अहमदाबादवरून सायंकाळी ७ वाजता सुटेल. ही गाडी अकोला येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.५० वाजता, बडनेरा ८.०२ वाजता, वर्धा ९.२८ वाजता, नागपूरला १०.५० वाजता आणि तिसऱ्या दिवशी पुरी येथे सकाळी ६.५५ वाजता पोहोचेल.

आठवड्यातून दोनवेळा धावणारी रेल्वेगाडी क्रमांक ०२६६९ चेन्नई सेंट्रल-छपरा ३० नोव्हेंबरपासून चेन्नई सेंट्रलवरून सायंकाळी ५.४० वाजता सुटेल. ही गाडी चंद्रपूरला दुसऱ्या दिवशी सकाळी ७.१८ वाजता, सेवाग्रामला ९ वाजता, नागपूरला १०.२५ वाजता आणि तिसऱ्या दिवशी छपरा येथे सकाळी ९.३५ वाजता पोहोचेल.

रेल्वेगाडी क्रमांक ०२६७० छपरा-चेन्नई सेंट्रल छपरावरून रात्री ९ वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी नागपूरला सायंकाळी ६.१५ वाजता, सेवाग्रामला ७.१८ वाजता, चंद्रपूरला रात्री ९.०५ वाजता आणि तिसऱ्या दिवशी चेन्नई सेंट्रलला सकाळी ११.३० वाजता पोहोचेल.

रेल्वेगाडी क्रमांक ०२८४३ पुरी-अहमदाबाद विशेष रेल्वेगाडी १ डिसेंबरपासून पुरीवरून सायंकाळी ५.३० वाजता सुटेल. ही गाडी नागपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी २.४५ वाजता, वर्धा येथे ३.५५, बडनेरा सायंकाळी ५.४२ वाजता, अकोला ६.४० वाजता वाजता आणि अहमदाबादला तिसऱ्या दिवशी सकाळी ६.२५ वाजता पोहोचेल.

रेल्वेगाडी क्रमांक ०२८४४ अहमदाबाद-पुरी विशेष रेल्वेगाडी ३ डिसेंबरपासून अहमदाबादवरून सायंकाळी ७ वाजता सुटेल. ही गाडी बडनेरा येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ८.०२ वाजता, वर्धा येथे ९.०८ वाजता, नागपूरला १०.५० वाजता आणि पुरीला तिसऱ्या दिवशी सकाळी ८.०५ वाजता पोहोचेल. बदललेल्या वेळापत्रकानुसार प्रवाशांनी आपला प्रवास निश्चित करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

...................

Web Title: Changes in the timing of nine superfast trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.