शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

सरकारच्या बहुजन नीतीविरोधात परिवर्तन यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 1:33 AM

मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांनी कोरेगाव-भीमा दंगल घडवून आणल्यानंतरही सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. दंगलीची न्यायालयीन चौकशी होण्यापूर्वी भिडेला क्लीन चिट देण्यात आली. दंगलीचा सूत्रधार भिडेला अटक करून, भिडे-एकबोटेला फाशी द्यावी, तसेच सरकारच्या बहुजन नीतीविरोधात वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात २४ एप्रिल ते ३ जून दरम्यान परिवर्तन यात्रा काढण्यात आली आहे. संविधान चौकातून शिरोमणी अकाली दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष सिमरनजितसिंग मान यांच्या उपस्थितीत परिवर्तन यात्रेला सुरुवात झाली.

ठळक मुद्देसंविधान चौकातून सुरुवात : बहुजन क्रांती मोर्चाबरोबर अनेक संघटनांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांनी कोरेगाव-भीमा दंगल घडवून आणल्यानंतरही सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. दंगलीची न्यायालयीन चौकशी होण्यापूर्वी भिडेला क्लीन चिट देण्यात आली. दंगलीचा सूत्रधार भिडेला अटक करून, भिडे-एकबोटेला फाशी द्यावी, तसेच सरकारच्या बहुजन नीतीविरोधात वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात २४ एप्रिल ते ३ जून दरम्यान परिवर्तन यात्रा काढण्यात आली आहे. संविधान चौकातून शिरोमणी अकाली दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष सिमरनजितसिंग मान यांच्या उपस्थितीत परिवर्तन यात्रेला सुरुवात झाली.ही यात्रा महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यामध्ये ३६७ तालुक्यात जाणार आहे. पुणे येथे ३ जून रोजी यात्रेचे समापन होणार आहे. परिवर्तन यात्रेत बहुजन क्रांती मोर्चा बरोबरच आॅल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड, शिरोमणी अकाली दल, सेंगल अभियान, राष्ट्रीय लिंगायत मोर्चा, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय नाभिक महासंघ, सत्यशोधक मूलनिवासी वारकरी संघ, आॅल इंडिया जैन-ओबीसी आॅर्गनायझेशन, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ, जमियत ए उल्मा हिंद आदी संघटनेचा सहभाग आहे. परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाचा अ‍ॅट्रॉसिटीच्या विरोधात आलेला निर्णय, न्यायपालिकेतील जातीय पूर्वग्रह, शेतकरी, कष्टकरी, मजूर, विद्यार्थी, महिला, अल्पसंख्यांक यांच्यावरचे अन्याय, ईव्हीएममधील भ्रष्टाचार आदी विषयावर जनजागृती करण्यात येणार आहे. या मोर्चात लिंगायत मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोरणेश्वर स्वामी अप्पा, प्रसिद्ध इतिहासकार प्रा. मा.म. देशमुख, आदिवासीचे राष्ट्रीय नेते सालखन मुरमु, खिश्चन धर्मगुरू डॉ. बिशप प्रदीप कांबळे, बी.एस. हस्ते, प्रा. वंदना बेंझमिन, प्रा. सुषमा भड, हाफिज अशरफ , प्रा. विलास खरात, रमेश पिसे, मौलाना शोऐब, हाफिज शमशुद्दीन, डॉ. आसिफुजमा खान आदी सहभागी झाले आहेत.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावagitationआंदोलन