शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

चाणक्यने कूटनीतीचा वापर जनकल्याणासाठी केला

By admin | Updated: January 14, 2015 00:42 IST

प्रखर बुद्धिमत्ता असलेले चाणक्य अनेक शास्त्रात पारंगत होते. त्यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर व संघटन कौशल्याच्या बळावर नंद राजाची सत्ता उलथून टाकली. आपल्या कौटिल्य नीतीचा वापर

चारुदत्त आफळे : कीर्तन महोत्सवाचा समारोपनागपूर : प्रखर बुद्धिमत्ता असलेले चाणक्य अनेक शास्त्रात पारंगत होते. त्यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर व संघटन कौशल्याच्या बळावर नंद राजाची सत्ता उलथून टाकली. आपल्या कौटिल्य नीतीचा वापर दुष्टांचा संहार करण्यासाठी केल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी कीर्तन महोत्सवात आर्य चाणक्यांचे जीवन चरित्र साकारताना केले. कीर्तन महोत्सव आयोजन समिती व राधा गोविंद चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने चिटणीस पार्कवर कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात चारुदत्त आफळे यांनी आज पाचवे आणि अंतिम पुष्प गुंफले. त्यांनी कीर्तनातून चाणक्यच्या बुद्धिमत्तेचा व संघटन कौशल्याचा परिचय करून दिला. आर्य चाणक्यांच्या वडिलांचा मित्र मगध राजाचा महामंत्री होता. धनानंद राजाचा घोटाळा त्याने उघडकीस आणला होता. त्यामुळे धनानंद राजाने महामंत्र्याला तुरुंगात डांबले. चाणक्याचे वडील कपिल देव यांनी त्याविरोधात आंदोलन केले. राजाने आंदोलन चिरडण्यासाठी कपिल देव यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. नंतर त्यांची हत्या केली. जीव वाचलेल्या विष्णू गुप्त ऊर्फ चाणक्य विद्याअध्ययनासाठी तक्षशिला येथे गेले. विष्णू गुप्तांचे पूर्वज चणक ऋषी कुळातील होते. त्यामुळे त्यांचे नाव चाणक्य पडले. चाणक्यांनी अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, आयुर्वेद व राज्यशास्त्राची पदवी मिळविली. चाणक्यांना धर्मदाय आयुक्त म्हणून काम मिळाले. चाणक्यपासून आपल्याला धोका आहे, हे ओळखुन नंदराजाने त्यांचा भरसभेत अपमान करून घालवून दिले. त्याचा प्रतिशोध तसेच वडिलांच्या हत्येचा वचपा काढण्यासाठी त्यांनी चंद्रगुप्ताला राजा बनविले. संघटन व बुद्धिमत्ता असलेल्या चाणक्यनी आपल्या ज्ञानाचा वापर करून नंदराजाची राजवट घालविली व ग्रीकांनाही हुसकावून लावले. कीर्तन महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी खा. दत्ता मेघे, आ. सुधाकर देशमुख, रा.स्व. संघाचे विदर्भ प्रांत सहसंचालक राम हरकरे, विजय काशीकर, ज्ञानेश्वर रक्षक उपस्थित होते. आजची आरती सुनील काशीकर व शिरीष पुरोहित यांच्याहस्ते संपन्न झाली. (प्रतिनिधी)